घरमनोरंजन‘रावरंभा’ चित्रपटाचा पार पडला दिमाखदार संगीत अनावरण सोहळा

‘रावरंभा’ चित्रपटाचा पार पडला दिमाखदार संगीत अनावरण सोहळा

Subscribe

हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नासाठी आणि छत्रपती शिवरायांसाठी घाम गाळणारे, लढणारे, प्रसंगी आनंदाने मृत्यूला मिठी ,मारणाऱ्या असंख्य मावळ्यांच्या गाथा आपल्याला माहित आहेत. पण या वीरांच्या पाठीमागे सावलीसारखी ठामपणे उभी राहणाऱ्या निर्व्याज प्रेम करणाऱ्या त्यांच्या सखीची गोष्ट खचितच आपल्याला माहित असते. कित्येक आया बहिणींनी स्वतःचे कुंकू वाहिले तेव्हा कुठे हे हिंदवी स्वराज्य उभे राहिले आहे. स्वराज्यासाठी तलवारीशी लगीन लागलेला ‘राव’ अन त्या तलवारीची खडी ढाल ‘रंभा’ यांची रांगडी प्रेमकहाणी उलगडून दाखविणारा निर्माते शशिकांत शीला भाऊसाहेब पवार निर्मित आणि अनुप जगदाळे दिग्दर्शित ‘रावरंभा’ हा ऐतिहासिक चित्रपट १२ मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. तत्पूर्वी या प्रेमकथेचे मोरपंखी पान उलगडून दाखविणारा भव्य संगीत अनावरण सोहळा कलाकार, तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत दिमाखात संपन्न झाला.

याप्रसंगी रंगमंचावर शिवकाळ अवतरला. संगीत अनावरणाचे औचित्य साधून चित्रपटातील कलाकारांनी ऐतिहासिक वेशात रंगमंचावर येत आपल्या भूमिकेची छोटीशी झलक उपस्थितांना दाखविली. ‘आधी स्वराज्य मग आपला संसार’ हे ब्रीद मानणाऱ्या रावजीला आपल्या प्रेमासाठी कोणत्या अग्निदिव्यातून जावं लागतं याची चित्तथरारक आणि रोमहर्षक कथा ‘रावरंभा’ चित्रपटातून उलगडणार आहे.

- Advertisement -

‘साथ साथ’, ‘हां मर्दा’ अशी स्फुरण चढणारी गीते आणि ‘तुझ्या दावणीला’, ‘एक रंभा एक राव’ या प्रेमगीताचा नजराणा चित्रपटातील गीत-संगीतातून रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. गुरु ठाकूर आणि क्षितिज पटवर्धन यांच्या लेखणीतून उतरलेल्या या गीतांना आदर्श शिंदे, आनंदी जोशी, हर्षवर्धन वावरे, रवींद्र खोमणे या गायकांचा स्वरसाज लाभला आहे. संगीतकार अमितराज यांनी ही सर्व गीते संगीतबद्ध केली आहेत. व्हिडिओ पॅलेसकडे चित्रपटाच्या गीताचे हक्क आहेत.

‘रावरंभा’ चित्रपटाची पटकथा, संवाद प्रताप गंगावणे यांचे आहेत. छायांकन संजय जाधव तर संकलन फैजल महाडिक यांचे आहे. कार्यकारी निर्माते महेश भारांबे, अन्वय नायकोडी आहेत. पार्श्वसंगीत आदित्य बेडेकर यांचे आहे. वेशभूषा पौर्णिमा ओक, रंगभूषा प्रताप बोऱ्हाडे, कलादिग्दर्शन वासू पाटील यांचे आहे. साहसदृश्ये शेवोलिन मलेश यांची आहेत. व्हीएफएक्सची जबाबदारी वॉट स्टुडिओ आणि जयेश मलकापूरे यांनी सांभाळली आहे. ध्वनीसंकलन दिनेश उच्चील, शंतनू अकेरकर यांचे आहे. प्रशांत नलवडे निर्मिती व्यवस्थापक आहेत.

- Advertisement -

हेही वाचा :

जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये शाहरुखसह एसएस राजामौलींच्या नावाचाही समावेश

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -