Tuesday, April 20, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन सुव्रत जोशीने दिली गुड न्यूज, घरात आला नवा पाहुणा

सुव्रत जोशीने दिली गुड न्यूज, घरात आला नवा पाहुणा

आमच्या दोघांच्या आयुष्यात तिसरा आला आहे,असं म्हणत सोशल मिडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर केला आहे.

Related Story

- Advertisement -

अभिनेता सुव्रत जोशी आणि अभिनेत्री सखी गोखले ११ एप्रिल २०१९ रोजी एकमेकांसोबत विवाहबंधनात अडकले. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेनिमित्त ते एकत्र काम करत होते. याच मालिके दरम्यान ते एकमेकांच्य प्रेमात पडले होते.सुव्रत जोशी आणि सखी गोखले ही जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडते. आता मात्र, अभिनेता सुव्रत जोशी याने सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. आमच्या दोघांच्या आयुष्यात तिसरा आला आहे,असं म्हणत सोशल मिडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर केला आहे. परंतु तिसरा पाहुणा दुसरं-तिसरं कोणी नसून त्याने गाडी घेतली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sula (@suvratjoshi)

- Advertisement -

आमच्या दोघांमध्ये काल रात्री तिसरा आला अस म्हणत, गाडी घ्यावी अशी १९९६ पासून माझ्या आईची इच्छा होती. २५ वर्षांनंतर माझ्या आईची ही इच्छा पूर्ण झाली. कोणत्याही मध्यमवर्गीय मुलाप्रमाणे मलाही आज खूप चांगले वाटत आहे. अनेक वर्षे गाडी न घेण्याचा प्रयत्न केला. पण सार्वजनिक वाहनांवर अवलंबून राहणे शक्य झाले नाही. त्यात इलेक्ट्रीसिटीवर चालणारी गाडी घेतली तर भारतात त्याला पुरेशा सोयी-सुविधा नाहीत. मी साधारण गाडी किती वापरणार याचा अंदाज बांधून माझ्यामुळे किती प्रदुषण होणार याबाबतची माहिती तज्ज्ञांकडून घेतली आहे. पुढच्या ५-६ वर्षात साधारण शंभरहून अधिक झाडे लावणार असल्याचा आशय कॅप्शनमध्ये दिले आहे. त्या पोस्टवर अनेक लोकांनी आणि कलाकारांंनी अभिनंदन केले आहे.


हेही वाचा – संजय राठोड राजीनामा देणार की मुख्यमंत्री राजीनामा घेणार!

- Advertisement -