घरमनोरंजनसुशांतच्या बायोपिकमध्ये त्याच्यासारखाच हुबेहुब दिसणारा अभिनेता

सुशांतच्या बायोपिकमध्ये त्याच्यासारखाच हुबेहुब दिसणारा अभिनेता

Subscribe

अभिनेता हुबेबुब सुशांत सारखा दिसत असल्याने सुरुवातीला अनेकांचा गोंधळ उडाला होता. त्याला पाहून अनेकांना सुशांतची आठवण झाली.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने अल्पवधीतच सिनेसृष्टीत आपली ओळख निर्माण केली होती. सुशांत आज आपल्यासोबत नाही आहे. सुशांतच्या मृत्यूमुळे त्याच्या चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला होता. सुशांतच्या अचानक जाण्याने चाहते प्रचंड निराश झाले होते. सुशांतने आत्महत्या केली की ,त्याची हत्या करण्यात आली हा प्रश्न अजून ही अनुत्तरीत आहे. सुशांतच्या मृत्यूच्या प्रकरणाची चौकशी सीबीआय करत आहे. पण मात्र त्याच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर एक चित्रपट मात्र बनून तयार आहे. नुकताच या चित्रपटाचा टिझरही प्रदर्शित करण्यात आला होता. ‘न्याय -द जस्टिस’ असे या आगामी चित्रपटाचे नाव आहे. सुशांत सिंहच्या जीवनपटावर आधारित या चित्रपटाची कथा असणार आहे. येत्या ११ जून ला सुशांतच्या मृत्यूला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे दिवंगत अभिनेत्याला श्रद्धांजली देत हा सिनेमा प्रदर्शित करण्यात येणार आहे.

- Advertisement -

सुशांतच्या आयुष्यावर आणखी एक चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता. ‘सुसाईट ऑर मर्डर’ असे या चित्रपटाचे नाव असून सचिन तिवारी या चित्रपटात मुख्य भूमिकेत असणार आहे. त्यात दिसणारा अभिनेता हुबेबुब सुशांत सारखा दिसत असल्याने सुरुवातीला अनेकांचा गोंधळ उडाला होता. त्याला पाहून अनेकांना सुशांतची आठवण झाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sachin Tiwari (@officialtiwarisachin)

 सचिन हा चित्रपटसृषटीत नवीन असून पूर्वी तो टिक टॉकवर व्हिडिओ बनवायचा. तिथेही तो सुशांतची कार्बन कॉपी म्हणून व्हायरल झाला होता. मात्र तो सुशांतची भूमिका साकारताना दिसत आहे.

- Advertisement -

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sachin Tiwari (@officialtiwarisachin)


हे वाचा-  प्रसाद ओक दिग्दर्शित ‘चंद्रमुखी’ चित्रपटाचा टीजर रिलिज

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -