घरताज्या घडामोडीअभिनेत्री Kishori Shahane यांच्या गाडीला भीषण अपघात; नशीब बलवत्तर म्हणून जीव वाचला

अभिनेत्री Kishori Shahane यांच्या गाडीला भीषण अपघात; नशीब बलवत्तर म्हणून जीव वाचला

Subscribe

अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या गाडीला भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ या ठिकणी ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत गाडीची हालत झाली असून, जीव मात्र वाचला असल्याची माहिती अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी फेसबुक पोस्ट लिहित दिली आहे.

अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या गाडीला भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ या ठिकणी ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत गाडीची हालत झाली असून, जीव मात्र वाचला असल्याची माहिती अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी फेसबुक पोस्ट लिहित दिली आहे. “आमच्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात आमच्या कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने आमचा जीव वाचला आहे. देवाच्या आशिर्वादाने आम्ही सर्वजण सुखरूप आहोत. जाको रखे सैया मार खाके ना कोई…” अशा आशयाचे कॅप्शन लिहित किशोरी शहाणे यांनी फेसबुक पोस्ट शेअर केली आहे.

- Advertisement -

किशोरी शहाणे हे टेलिव्हिजन आणि बॉलीवूडमधील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आहे. किशोरी शहाणे गेल्या ३ दशकांपासून मनोरंजन विश्वात सक्रिय आहेत. तिने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. गम है किसी के प्यार में या टीव्ही शोमध्ये भवानीची भूमिका साकारणारी अभिनेत्री किशोरी शहाणेला प्रेक्षकांंकडून चांगलीच पसंती मिळली आहे.

किशोरी शहाणे यांनी शिर्डी साई बाबा, हफ्ता बंद, प्यार का देवता, कर्मा, बॉम्ब ब्लास्ट, मुंबई गॉडफादर, प्यार में ट्विस्ट, शादी बिफोर शादी, मिलेंगे मिलेंगे, भय, रेड: द डार्क साइड, सुपरस्टार, मोहेंजो दारो आणि यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. दुसरीकडे, किशोरीने जुनून, अभिमान, कोई अपना सा, ऐसा करो ना विडालिया, यह मैं घर घर खेल, शक्ती अस्तित्व के एहसास की यांसारख्या टेलिव्हिजन शोमध्ये काम केले आहे.

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -