घरमनोरंजन'माझ्या आयुष्यातील नवीन भूमिका', अभिनेत्री नेहा जोशी अडकली विवाहबंधनात

‘माझ्या आयुष्यातील नवीन भूमिका’, अभिनेत्री नेहा जोशी अडकली विवाहबंधनात

Subscribe

नेहा जोशीने कोणताही गाजवाजा न करता लग्न केलं आहे(neha joshi wedding). सध्या सोशल मीडियावर नेहाच्या लग्नाच्या फोटोंवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

मराठी मलिका आणि चित्रपटांमधला लोकप्रिय चेहरा म्हणजे अभिनेत्री नेहा जोशी(atress neha joshi). नेहा जोशीने मराठी सोबतच हिंदी सिनेसृष्टीतही काम केले आहे. अभिनेत्री नेहा जोशीचा चाहता वर्गसुद्धा मोठा आहे. नेहा जोशी नुकतीच विवाह बंधनात अडकली आहे. तिच्या लग्नाचे काही फोटो तिने शोषल मीडियावर शेअर केले आहेत. नेहा जोशीने कोणताही गाजवाजा न करता लग्न केलं आहे(neha joshi wedding). सध्या सोशल मीडियावर नेहाच्या लग्नाच्या फोटोंवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

हे ही वाचा – 800 कोटींचा राजवाडा, गाड्यांसह सैफ अली खानची कोट्यवधींची संपत्ती पाहून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल

- Advertisement -

मराठमोळी अभिनेत्री नेहा जोशी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. नेहाने नुकतेच तिचे काही फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. त्यापैकी एका फोटोत नेहाने मुंडावळ्या बांधून नववधूचा शृंगार केलेला दिसत आहे. या फोटोवर नेहाने एक सुंदर असं कॅप्शन सुद्धा दिलं. ”माझ्या आयुष्यातील नवीन भूमिका” असं कॅप्शनसुद्धा नेहाने फोटोला दिले आहे. त्याचसोबत दुसऱ्या एका फोटोमध्ये नेहा तिच्या नवऱ्यासोबत दिसत आहे. त्यात नेहाने मुंडावळ्या बांधलेल्या दिसत आहेत आणि हातात हिरवा चुडा सुद्धा भरलेला दिसत आहे(actress neha joshi wedding).

 

View this post on Instagram

 

A post shared by Neha Joshi (@joeneha)

- Advertisement -

हे ही वाचा – चमचमीत रेसिपीजनंतर मधुरा झळकणार ‘या’ प्रसिद्ध मालिकेत

ओमकार कुलकर्णी (neha joshi and omkar kulkarni)असे नेहाच्या पतीचे नाव आहे. नेहाने तिचा पती ओमकार किलकर्णी याच्या सोबत फोटो शेअर करत ”अखेर लग्नबंधनात अडकली” असे समर्पक कॅप्शन सुद्धा दिले आहे. नेहाच्या लग्नाचे फोटो समोर येताच तिच्या चाहत्यांनी सुद्धा तिला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याच बरोबर मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारांनी सुद्धा नेहा जोशीच्या फोटोवर कमेंट करत तिला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नेहा जोशीने आत्तापर्यंत मराठी चित्रपट, नाटक आणि मालिकांमधून वेगवेगळ्या धाटणीच्या भेऊमिक साकारल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Neha Joshi (@joeneha)

हे ही वाचा – ‘बस बाई बस’च्या मंचावर पंकजा मुंडेंचा खेळकर अंदाज

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -