Thursday, July 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी ब्रा स्ट्रॅपमुळे अभिनेत्री प्रिया अहुजा ट्रोल, नवऱ्याने दिलं सडेतोड उत्तर

ब्रा स्ट्रॅपमुळे अभिनेत्री प्रिया अहुजा ट्रोल, नवऱ्याने दिलं सडेतोड उत्तर

पतीने दिलेल्या सडेतोड उत्तरानंतर सर्वांचीच बोलती बंद झाली

Related Story

- Advertisement -

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका तारक मेहता का उलटा चश्मा मधील अभिनेत्री प्रिया आहुजा (Priya Ahuja ) म्हणजेच मालिकेतील रिटा रिपोर्टर फार कमी वेळात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. मात्र गेल्या काही दिवसांपासून प्रिया अहुजा मालिकेपासून दूर आहे. प्रेग्नंसीमुळे प्रियाने मालिकेपासून दूर राहणे पसंत केले आहे. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. नुकताच प्रियाने तिचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्या फोटोत तिच्या ब्रा स्ट्रॅप दिसत असल्याने तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केले होते. मात्र तिच्या ट्रोलर्सना तिचा पती आणि तारक मेहता का उलटा चश्मा या मालिकेचा दिग्दर्शक राजीव मालदाने यांने चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. ‘तुमच्या आई किंवा बहिणीलासुद्धा अशा कमेंट करुन दाखवा आणि बघा काय प्रतिक्रिया येत’, असे सडेतोड उत्तर राजीव मालवा याने आपली पत्नी प्रिया अहुजा हिच्या ट्रोलर्सना दिले आहे.

- Advertisement -

प्रियाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक फोटो शेअर केला आहे ज्यात तिने निळ्या रंगाचा डेनिमचा शर्ट घातला आहे. त्यात तिच्या ब्राची स्ट्रॅप दिसत आहे. अनेकांनी प्रियाच्या या बोल्ड अदांचे कौतुक केले तर अनेकांनी तिच्या ब्रा स्ट्रॅप्समुळे तिला ट्रोल केले. मात्र पतीने दिलेल्या सडेतोड उत्तरानंतर सर्वांचीच बोलती बंद झाली आहे.

- Advertisement -

प्रेग्नंसीमुळे प्रिया सध्या सिनेसृष्टीपासून दूर आहे. नुकतीच ती एका मुलाची आई देखील झाली असल्याने जास्तीत जास्त वेळ ती तिच्या मुलासोबत आणि कुटुंबासोबत घालवताना दिसत आहे. प्रिया अनेकदा आपल्या मुलासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसत असते.


हेही वाचा – सिद्धार्थ विचारतोय तुला काय हवंय?

 

- Advertisement -