NCB ने छापेमारी केलेल्या कार्डेलिया क्रूझवर आता ‘ही’ अभिनेत्री करतेय पिकनिक इन्जॉय

शेनाज  तिच्या फॅमिलीसोबत क्रूझवर राहिली आहे.

actress Shenaz Treasury enjoying picnic on the NCB-raided Cardelia Cruise
NCB ने छापेमारी केलेल्या कार्डेलिया क्रूझवर आता 'ही' अभिनेत्री करतेय पिकनिक इन्जॉय

आलिशान अशा कार्डेलिया क्रूझवरुन (Cardelia Cruise)  शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) ड्रग्ज प्रकरणी (Drugs case) अटक केल्यानंतर कार्डेलिया क्रूझ चांगलची चर्चेत आली. आर्यनच्या अटकेनंतर या क्रूझवर अभिनेत्री, होस्ट आणि ट्रॅव्हलर शेनाज (Shenaz Treasury) सुट्ट्या घालवण्यासाठी गेली आहे. शेनाजने आलिशान क्रूझवरील तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत. शेनाज  तिच्या फॅमिलीसोबत क्रूझवर राहिली आहे. इन्स्टाग्रामवर शेनाज क्रूझवरील तिचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. जे पाहून ही पुन्हा एकदा कार्डेलिया क्रूझची चर्चा सुरू झाली आहे.

शेनाजने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती तिच्या फॅमिलीसोबत सुट्टी इन्जॉय करताना दिसत आहेत. आलिशान क्रूझवर गेलेली शेनाज फारच एक्साइड दिसत असून बाहेरुन क्रूझ शानदार दिसते. मात्र क्रूझच्या आत गेल्यानंतर त्याची शान आणखी वाढते आणि प्रवशांनी क्रूझ त्याच्या प्रेमात पाडते, असे शेनाजने म्हटले आहे.

शेनाजने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, क्रूझ खूप रॉयल आणि क्लासी आहे. क्रूझच्या आत आलिशान हॉटेल आहे. शेनाज पहिल्यांदा क्रूझवर राहिली आहे. तिचे वडिल कॅप्टन होते त्यामुळे अनेक शिप्सवर गेली आहे मात्र पॅसेंजर क्रूझवर ती पहिल्यांदाच आल्याचे तिने म्हटले आहे.

शेनाज शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती शिपच्या लॉबीमध्ये पोज देऊन बसलेली दिसत आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये शेनाजने क्रूझच्या आतील व्ह्यू दाखवला आहे. एनसीबीने छापेमारी केलेली क्रूझ नेमकी कशी आहे असा प्रश्न अनेकांना पडला होता. शेनाजने शेअर केलेल्या फोटोंमध्ये क्रूझ किती मोठे आहे याचा अंदाज आला आहे.

 


हेही वाचा – Say No To Drugs : आर्यनच्या अटकेनंतर बॉलिवूडमधील ३१ वर्षांपूर्वींच्या मोहिमेला संजीवनी