मराठमोळ्या अंदाजात फोटो शेअर करत अभिनेत्रींनी दिल्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा

मराठी  अभिनेत्रींनीही खास अंदाजात त्यांच्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सगळेच जण आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करत आहेत. सर्वत्रच दिवाळीचा उत्साह दिसत आहे. अशातच मराठी कलाकार सुद्धा त्यांच्या शूटिंग मधून विश्रांती घेऊन त्यांच्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करत आहेत. दरम्यान मराठी  अभिनेत्रींनीही खास अंदाजात त्यांच्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

महाराष्ट्राची लाडकी विनोदवीर श्रेया बुगडेनं "नारी हॅप्पी इन साडी" असं म्हणत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात. 1) महाराष्ट्राची लाडकी विनोदवीर, अभिनेत्री श्रेया बुगडे हिने सुद्धा तिच्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. श्रेया बुगडेचा चाहता वर्ग सुद्धा मोठा आहे. ”नरी हॅपी इन साडी” असं म्हणत श्रेया बुगडेने सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

महाराष्ट्राची क्रश हृता दुर्गुळे आणि प्रतीक शाह लग्नानंतरी पहिली दिवाळी साजरी करत आहेत.

2) अभिनेत्री ऋता दुर्गुळेचं नुकतंच लग्न झालं आहे. लग्नांनंतरची ऋताची ही पहिलीच दिवाळी आहे. ऋताने तिचा पती प्रतीक शाह याच्या सोबत फोटो शेअर करत तिच्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

3) अभिनेत्री हेमांगी कवीसुद्धा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. हेमांगीने सुद्धा तिच्या चाहत्यांना हटके स्टाईलने सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेत्री सायली संजीव मराठमोळ्या अंदाजात दिसत आहे. हर हर महादेव हा तिचा सिनेमा 25 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.

4) हर हर महादेव या चित्रपटामुळे सध्या अभिनेत्री सायली संजीव चर्चेत आहे. सायलीने मराठमोळ्या पद्धतीने सजून सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

नवा गडी नवं राज्य मालिकेची निर्माती अभिनेत्री श्रृती मराठेनं दिवाळीनिमित्त खास फोटोशूट केलंय.

5) झी मराठी वरील नवा गाडी नवं राज्य या मालिकेची निर्माती श्रुती मराठे ही दिवाळीसाठी स्पेशल फोटोशूट केलं आहे. त्यात तिचा लुक सुद्धा खूप सुंदर दिसत आहे. श्रुतीनेही तिच्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.