घरमनोरंजनअजयचा 'तान्हाजी' लूक प्रदर्शित!

अजयचा ‘तान्हाजी’ लूक प्रदर्शित!

Subscribe

अभिनेता अजय देवगणचा ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ या चित्रपटातील लूक प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात अजय तान्हाजी मालुसरेंची भूमिका साकारत आहे. कोंढाणा किल्ला जिंकण्यासाठी सिंहासारखे लढणारे तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमावर हा चित्रपट आधारित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात नरवीर तानाजी मालुसरे यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. शिवाजी महाराजांच्या सैन्यातील तान्हाजी मालुसरे हे अत्यंत पराक्रमी आणि विश्वासू साथीदार होते.

- Advertisement -

हाती तलवार घेऊन भेदक नजरेनं पाहणाऱ्या अजयच्या या पोस्टरवर ‘स्वराज से बढकर क्या?’ अशी टॅगलाइन देण्यात आली आहे. या चित्रपटाचे नाव ‘तान्हाजी’ठेवण्याच्या मुद्दय़ावरून चित्रपटकर्त्यांवर समाजमाध्यमातून टीका होत होती. संख्याशास्त्रानुसार हा बदल करण्यात आल्याचा आरोप होत होता. मात्र, मालुसरे यांच्या वंशजांपासून ते काही इतिहास अभ्यासकांनी मूळ नाव ‘तान्हाजी’ असल्याचे म्हटले आहे.

अजय देवगणचा बिग बजेट चित्रपट तानाजी असणाऱ्या तानाजी या चित्रपटाची निर्मिती टी सीरिजने केली आहे. इतिहासाशी संबंधित असणाऱ्या या चित्रपटाच्या कथेसाठी भूषण कुमारने अजय देवगणला कास्ट केले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत हे करत आहेत. या चित्रपटात सैफ अली खान हा राजपुत मोघल किल्लेदार उदयभान राठोड यांच्या भूमिकेत आहे. १५० कोटी रुपयांच्या बजेट असलेल्या या चित्रपटात तान्हाजी मालुसरेंच्या पत्नीची भूमिका काजोल साकारणार असल्याचं म्हटलं जात आहे. अद्यापही चित्रपटातील इतर व्यक्तीरेखांवरून पडदा उठणं बाकी आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -