घरमुंबईराज्यपालांकडून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची अधिकृत शिफारस

राज्यपालांकडून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची अधिकृत शिफारस

Subscribe

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे शिफारस पत्र देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पाठवले आहे. या संदर्भात राजभवनातून एक पत्रक जारी करण्यात आले आहे. या पत्रकात राज्यपालांकडून संविधानाच्या कलम ३५६ अंतर्गत देशाचे राष्ट्रपतींकडे राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे शिफारस पत्र पाठवण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १९ दिवस होऊन गेले. मात्र, अद्यापही राज्यात स्थिर सरकार स्थापन झालेले नाही. त्याच पार्श्वभूमीवर राज्यपालांनी हे पत्र पाठवले आहे.

- Advertisement -

राज्यपालांनी नियमानुसार सर्वाधिक जागांवर यश मिळवणाऱ्या तीन राजकीय पक्षांना क्रमानुसार सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिले होते. राज्यपालांनी भाजपला ४८ तासांची मुदत दिली होती. मात्र, ४८ तासांत भाजप सरकार स्थापन करु शकले नाही. त्यानंतर राज्यपालांनी शिवसेनेलाही संधी दिली. मात्र, यात शिवसेनाही अपयशी ठरली. त्यानंतर सोमवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास राष्ट्रवादी पक्षाला संधी दिली. त्यामुळे आज रात्री साडे आठ वाजेपर्यंत राष्ट्रवादीला राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करायचा आहे. मात्र, त्याअगोदरच राज्यातील सध्याची परिस्थिती बघता राज्यपालांनी केंद्राकडे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारसीचे पत्र पाठवले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -