घरताज्या घडामोडीDrishyam 2 : 'दृश्यम 2' च्या शूटिंगला सुरुवात, फोटो व्हायरल

Drishyam 2 : ‘दृश्यम 2’ च्या शूटिंगला सुरुवात, फोटो व्हायरल

Subscribe

Drishyam 2 :  बॅालीवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता अजय देवगण नेहमीच त्याच्या धमाकेदार चित्रपटातून आणि कडक अभिनयातून प्रेक्षकांची मन जिंकत असतो. आता तो नव्याने पुन्हा ‘दृश्यम २’ या चित्रपटातून झळकणार आहे. याआधी २०१५ मध्ये रिलीज झालेला अजयचा ‘दृश्यम’ हा सिनेमा प्रचंड गाजला होता. ही कथा खरंतर थ्रिलर स्वरूपातील होती, त्यात अजय मुख्य भूमिका साकारत होता. ‘विजय साळगावकर’ हे त्या पात्राचे नाव होते. जो एका लहान खेडेगावातील सामान्य केबल नेटर्वकची नोकरी करून स्वतःचे घर चालवतो. विजयचे त्याच्या कुटुंबावर खूप प्रेम असते. विजयला चित्रपट पाहण्याची आवड असते. सुखी-समाधानी त्याच्या आयुष्यात एक दिवस अचानक दुःखाचं वादळ येतं आणि त्याचं आयुष्य उद्धस्त होऊन जातं. सैम नावाचा एक मुलगा त्याच्या मोठ्या मुलीचा विडियो इंटरनेट वर वायरल करतो. सैम हा IG मीरा देशमूख चा मुलगा असतो. एक दिवस सैम अचानक गायब होतो. त्याच्या गायब होण्यामागे साळसकर कुटुंबाकडे संशयाने पाहिलं जातं.

‘दृश्यम’ हा चित्रपट मल्याळम मधील ‘मोहनलाल’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात अजय बरोबर श्रियी सरन त्याच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘विजय साळगावकर’ हे अजयने साकारलेल्या पात्राचं नाव आहे. तब्बू ने या चित्रपटात IG मीरा देशमूख ही भूमिका साकारली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

- Advertisement -

सोशल मिडियावर अजयने चित्रपटाचा निर्माता अभिषेक पाठक आणि श्रिया सरन यांच्यासह शूटिंगदरम्यानचा फोटो शेयर केला आहे. “विजय पुन्हा त्याच्या कुटुंबाचे रक्षण करू शकेल?” असे कॅप्शन देत  चाहत्यांची उत्सुकता वाढवली  आहे,
‘दृश्यम’  चित्रपटातील ही  थ्रिलर कथा याआधीही प्रेक्षकांना भावली होती. त्यामुळे याआधीच्या ‘दृश्यम’ प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे येत्या ‘दृश्यम २’ ला ही प्रेक्षक नक्कीच चांगला प्रतिसाद देतील.

- Advertisement -

२०२१ मध्ये अजयने गोलमाल ५ , सूर्यवंशी या चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती. २०२० मधील अजयच्या ‘तान्हाजी’ या चित्रपटाने प्रेक्षकांची मन जिंकली होती.


हेही वाचा – गे मुलगा आणि लेस्बियन मुलगी, नेमकं लॅव्हेंडर मॅरेज म्हणजे काय?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -