आलिया-रणबीरने केला मुलाचा गाजावाजा; 600 कोटींचा केला चुराडा, ‘ब्रह्मास्त्र’वर कंगनाचा हल्लाबोल

अभिनेता रणबीर कपूर आणि आलियाच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटावर ताशेरे ओढले आहेत. कंगनाने या चित्रपटाबाबत तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर आपला राग व्यक्त केला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत नेहमीच तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. आता नुकताच कंगनाने पुन्हा एकदा अभिनेता रणबीर कपूर आणि आलियाच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटावर ताशेरे ओढले आहेत. कंगनाने या चित्रपटाबाबत तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर आपला राग व्यक्त केला आहे. तसेत तिने या चित्रपटाचा दिग्दर्शक अयान मुखर्जीवर देखील निशाना साधला आहे.

‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटावर कंगनाचा राग


कंगना रनौतने ‘ब्रह्मास्त्र’च्या दिग्दर्शकासोबकत करण जौहर आणि आलियावर देखील आपला राग व्यक्त केला आहे. कंगनाने दिग्दर्शक अयान मुखर्जीवर खोटं विकण्याचा आरोप केला आहे. ती म्हणाली की, बॉलिवूडचा एक वर्ग आहे जो आपल्या चित्रपटाचा कोणतीही हद्द पार करू शकतो. कंगनाने त्याच्यावर कमाल आर खानच्या अटकेचा आरोप लगावला आहे.

कंगनाने शेअर केले स्क्रीनशॉट


‘ब्रह्मास्त्र’ मधील मौनी रॉय, अमिताभ बच्चन आणि नागार्जुनसोबतच आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे कलाकार आहेत. कंगनाने चित्रपटाच्या नकारात्मक रिव्यूचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे आणि लिहिलंय की, “असं तेव्हा होतं, जेव्हा तुम्ही खोटं विकण्याचा प्रयत्न करता. करण जौहर प्रत्येक कार्यक्रमामध्ये आलिया भट्ट आणि रणबीरला उत्तम अभिनेता आणि अयान मुखर्जीला हुशार सांगण्यासाठी जबरदस्ती करतो. त्यामुळे त्यांनी या खोट्यावर विश्वास ठेवायला सुरूवात केली.”
पुढे कंगना म्हणाली की, यातून काय सिद्ध होतं की 600 कोटी त्या चित्रपटासाठी ज्याला अशा दिग्दर्शकाने तयार केले आहे ज्याने आपल्या आयुष्यात एकही चांगला चित्रपट तयार केला नाही.

आलिया-रणबीरचा मुलगा पीआर


कंगनाने आलिया आणि रणबीरच्या लग्नाबाबत देखील आपलं मत मांडलं. त्यावेळी ती म्हणाली की, “त्यांच्या बाळापासून ते लग्नापर्यंत मीडियाला नियंत्रित करत आहे. त्यांनी केआरकेला जेलमध्ये टाकलं. रिव्यू विकत घेतले. तिकिटं खरेदी केली. ते सगळे बेईमानी करू शकतात, परंतु एक चांगला चित्रपट तयार करू शकत नाहीत.”


हेही वाचा : 

‘ब्रह्मास्त्र’ला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद; पहिल्या दिवशी कमावला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला