Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन अल्लू अर्जुन आणि रश्मिकाकडून रशियामध्ये 'पुष्पा: द राइज'च्या प्रमोशनला सुरुवात

अल्लू अर्जुन आणि रश्मिकाकडून रशियामध्ये ‘पुष्पा: द राइज’च्या प्रमोशनला सुरुवात

Subscribe

अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाच्या ‘पुष्पा: द राइज’या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यापासून अनेक भाषेतील बॉक्स ऑफिसवर आपले वर्चस्व गाजवले यात काही शंका नाही. अशातच, आता निर्माते रशियामध्ये या चित्रपटाच्या रिलीजसाठी तयारी करत आहेत. ‘पुष्पा: द राइज’साठी यशस्वी पत्रकार परिषद घेतल्यानंतर निर्माते चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सज्ज झाले आहेत. आज प्रमोशनचा पहिला दिवस असून, चित्रपटाच्या मुख्य कलाकारांसह टीम त्यांच्या ब्लॉकबस्टर चित्रपटाबद्दल बोलण्यास उत्सुक आहे.निर्मात्यांनी प्रमोशनच्या पहिल्या दिवसाचे उत्साही पुष्पा टीमचे आनंदी फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

हा चित्रपट डिसेंबर २०२१ मध्ये भारतात प्रदर्शित झाला असून, दिवसेंदिवस याचे क्रेझ वाढत आहे. अशातच, आता कलाकार आणि क्रू यांच्या उपस्थितीत 1 डिसेंबर रोजी मॉस्कोमध्ये आणि 3 डिसेंबर रोजी सेंट पीटर्सबर्गमध्ये या चित्रपटाचा विशेष प्रीमियर होईल. तसेच, रशियातील २४ शहरांमध्ये होणाऱ्या ५व्या भारतीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात या चित्रपटाचा प्रीमियर होणार आहे.

- Advertisement -

‘पुष्पा: द राइज’हा चित्रपट ८ डिसेंबर रोजी रशियात प्रदर्शित होणार आहे. तसेच, या चित्रपटाची क्रेझ वाढत असतानाच, चाहते चित्रपटाशी संबंधित प्रत्येक अपडेटची आतुरतेने वाट पाहत आहेत कारण टीम ‘पुष्पा: द रुल’साठीही तयारी करत आहे.

 


- Advertisement -

हेही वाचा :

विकी कौशलचा ‘सॅम बहादूर’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

- Advertisment -