घरमनोरंजनअमृताचा 'पाँडिचेरी' चित्रपट, मोबाईलवर होणार शूट

अमृताचा ‘पाँडिचेरी’ चित्रपट, मोबाईलवर होणार शूट

Subscribe

'पाँडेचिरी' चित्रपटात अमृतासोबत अभिनेत्री सई ताम्हणकर आणि वैभव तत्ववादी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

‘वाजले की बारा’ गर्ल अमृता खानविलकर हिने नेहमीच तिच्या नृत्याने आणि ग्लॅमरल अदांनी प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं आहे. मराठी चित्रपटांसोबतच अमृता ‘राझी’ आणि ‘सत्यमेव जयते’ या हिंदी चित्रपटांमधूनही झळकली आहे. दरम्यान सध्या चर्चा आहे ती अमृता खानविलकरच्या आगामी मराठी चित्रपटची. हिंदी चित्रपटांमध्ये तसंच वेबसिरीजमध्ये झळकलेली अमृता गेल्या काही काळापासून मराठी चित्रपटांपासून लांब होती. त्यामुळे मराठीतील तिच्या कमबॅकविषयी तिचे चाहते उत्सुक होते. मात्र, आता अखेर अमृताच्या आगामी मराठी चित्रपटाचे नाव समोर आले आहे. ‘पाँडिचेरी’ असं अमृताच्या आगामी मराठी चित्रपटाचे नाव आहे. सचिन कुंडलकर हे ‘पाँडिचेरी’ चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असून, लवकरच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार असल्याचं समजतंय. गोव्यातील ‘पाँडिचेरी’ या सुंदर शहरात या चित्रपटाचं शूटिंग होणार आहे. अमृता खानविलकरने नुकताच ‘पाँडिचेरी’ चित्रपटातील आपला लूक इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. अमृताच्या चाहत्यांची या फोटोंना भरभरुन पसंती मिळते आहे. हा फोटो शेअर करतेवेळी अमृताने चित्रपटातील अन्य कलाकारांच्या नावाचा उल्लेख केला असून त्यांच्यासोबत काम करायला मिळाल्याचा आनंद असल्याचं म्हटलं आहे. ‘पाँडेचिरी’ चित्रपटात अमृतासोबत अभिनेत्री सई ताम्हणकर आणि वैभव तत्ववादी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

Finally sharing the news of my first marathi film for the next year @Regrann from @kundalkar – This talented girl joins our film Pondicherry . Our next , to be shot entirely on smartphone . Happy to have you on board Amruta . The casting call thus gets over with three wonderful actors ready to jump into the dynamic process of shooting this film where camera will be almost invisible and the city is the fourth character. सई ताम्हणकर आणि वैभव तत्त्ववादी ह्यांच्यासोबत अमृता खानविलकर “पाँडिचेरी” ह्या चित्रपटात तीसरी महत्वाची भूमिका साकारणार . अमृताचे मनापासून स्वागत . कास्टिंग ची प्रक्रिया पूर्ण झाल्याचा आनंद ! @amrutakhanvilkar @saietamhankar @vaibhav.tatwawaadi

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar) on

 सौजन्य- अमृता खानविलकर/इन्स्टाग्राम

- Advertisement -


मोबाईलवर शूट होणारा पहिला मराठी चित्रपट

हल्ली उत्तमोत्तम कॅमेरे असलेले मोबाईल बाजारात येत आहेत. मोबाईल कॅमेराच्या सहाय्याने चित्रीत केलेल्या विविध शॉर्टफिल्म्स आतापर्यंत प्रदर्शित झाल्या आहेत. परंतु मोबाईल कॅमेराच्या सहाय्याने चित्रीत केलेला पहिला मराठी चित्रपट येऊ घातला आहे. पहिल्यांदाच असा प्रयोग होताना दिसणार आहे. नेहमीच काहीतरी वेगळा प्रयोग करणारे दिग्दर्शक सचिन कुंडलकर हा आगळावेगळा प्रयोग करणार आहेत. कुंडलकरांनी आतापर्यंत केलेले सगळेच प्रयोग यशस्वी झाले नाहीत. त्यांचे काही प्रयोग अपयशी ठरले आहेत. कुंडलकर नेहमीच पठडीबाहेरचे चित्रपट रसिकांसाठी आणतात. त्यांचा आगामी चित्रपटदेखील पठडीबाहेरचा असेल, असे त्यांनी सांगितले आहे.

 

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -