Animal : रणबीर कपूर- परिणीतीच्या बहुचर्चित ‘अ‍ॅनिमल’ची तारीख जाहीर

Animal: Ranbir Kapoor, Parineeti Chopra, Anil Kapoor starrer gets release date
Animal : रणबीर कपूर- परिणीतीच्या बहुचर्चित 'अ‍ॅनिमल'ची तारीख जाहीर

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि परिणीतीचा बहुचर्चित ‘अ‍ॅनिमल’ सिनेमाची तारीख जाहीर झाली आहे. तब्बल एक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ११ ऑगस्ट २०२३ रोजी जगभरातील अनेक देशांमध्ये ‘अ‍ॅनिमल’ सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमात परिणीती चोपडा आणि रणबीर कपूर मुख्य भूमिकेत झळकणार आहे. विशेष म्हणजे रणबीर, परिणीतीसह या सिनेमात अनिल कपूर आणि बॉबी देओलही झळकणार आहे. चित्रपट दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा आणि रणबीर कपूर प्रथमच एकत्र काम करत आहे. त्यामुळे तगडी स्टारकास्ट असणारा सिनेमा पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.


या सिनेमाची निर्मिती भूषण कुमार आणि कृष्ण कुमार यांच्या टी-सीरिज आणि प्रणय रेड्डी वांगा यांच्या भद्रकाली पिक्चर्स आणि मुराद खेतानी यांच्या सिने-१ स्टुडिओद्वारे करण्यात आले आहे. रणबीर कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास, रणबीर कपूर लवकरचं ‘ब्रम्हास्त्र’ सिनेमात झळकणार आहे, याशिवाय ‘शमशेरा’मध्येही तो महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.

तर परिणीती चोप्रा सध्या सूरज बडजात्या यांच्या ‘ऊंचाई’ या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमाची शूटिंग नेपाळमध्ये सुरु आहे. परिणीतीसह या सिनेमात अमिताभ बच्चन, अनुपम खैर, बोमन इराणी, नीना गुप्ता, सारिका आणि डॅनी महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे.