मिलींद आणि अंकिताच्या वयामध्ये २६ वर्षांचे अंतर आहे. त्यामुळे त्यांच्या दोघांच्या घरातून लग्नासाठी नकार होता.
अभिनेता मिलींद सोमण आणि त्याची २६ वर्षांनी लहान बायको अंकिता कायम चर्चेत असतात. या दोघांच्या लग्नावेळी त्यांच्या वयातील अंतरामुळे खूप चर्चा झाली होती. यांच्या लग्नाला नुकतचं एक वर्षपुर्ण झालं आहे. लग्नानंतर एक वर्षानंतर मिलिंद आणि अंकिताने घरातल्यांना लग्नासाठी कसे तयार केले तसेच त्या दोघांची पहिली भेट कशी झाली याचा खुलासा केला आहे. अंकिताची ही पोस्ट सोशलमिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.‘ह्युमन ऑफ बॉम्बे’ नावाच्या फेसबुक पेजवर अंकिता आणि मिलिंदने त्यांची लव्हस्टोरी शेअर केली आहे. याच मुख्य कारण म्हणजे या पोस्टमध्ये अंकिताने आपल्या पहिल्या बॉयफ्रेण्डचाही उल्लेख केला आहे.
या पोस्टमध्ये अंकिता म्हणते, अंकिताने पोस्टच्या सुरूवातीलाच प्रियकराच्या अचानक मृत्यूबद्दल लिहीलं आहे. त्याच्या मृत्यूनंतर अंकिता मलेशियाला गेली. तेथे गेल्यानंतर अंकिता एअर एशियामध्ये कॅबिन क्रू म्हणून काम करत होती. काही दिवसांनंतर तिची चेन्नईला बदली झाली आणि अंकिता पुन्हा भारतात परतली. यावेळी चेन्नईच्या एका हॉटेलमध्ये रहात असताना अंकिताने मिलिंदला लॉबिमध्ये बघितले. अंकिता आधीपासूनच मिलींदची मोठी चाहती होती.
तिने मिलिंदशी संवाद साध्यण्याचा प्रयत्न केला. परंतु, मिलिंद त्याच्या कामात व्यग्र होता. काही दिवसांनंतर अंकिता एका नाईट क्लबमध्ये पार्टीसाठी गेली होती. दरम्यान मिलिंद देखील तेथे उपस्थित होता. यावेळी अंकिताने मित्रांच्या सांगण्यावरून मिलींदशी संवाद साधला. त्यानंतर मिलींदने अंकिताचा नंबर घेतला. त्यावेळी अंकिताने तिच्या मैत्रिणीचा नंबर दिला. काहीदिवसांनी त्या दोघांमध्ये बोलणं सुरु झाले आणि त्यांच्या नात्याला सुरुवात झाली.
पाच वर्ष ऐकमकांना डेट केल्यानंतर त्या दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल घरी सांगण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला अंकिता आणि मिलिंदच्या घरातल्यांची वयातील अंतरामुळे लग्नाला नकरा दिला. परंतु मुलांच्या आनंदापुढे पालकांचे काही चालत नसल्याचे अंकिताच्या पोस्टमधून स्पष्ट झाले आहे. अशा प्रकारे अंकिता आणि मिलिंदची लव्हस्टोरीला सुरूवात झाली आणि अखेर लग्नानंतरही त्यांच्या नात्यात तो गोडवा टिकून राहिला.