घरमनोरंजनसिनेसृष्टीला आणखी एक धक्का, प्रसिद्ध अभिनेत्याची गळफास घेऊन आत्महत्या

सिनेसृष्टीला आणखी एक धक्का, प्रसिद्ध अभिनेत्याची गळफास घेऊन आत्महत्या

Subscribe

अभिनेत्याचे आत्मह्त्या करण्याचे कारण अद्याप अस्पष्ट

सिनेसृष्टीत मागील वर्षी अनेक कलाकारांचा मृत्यू झाला तर काही सिनेतारकांनी आपले आयुष्य संपवून घेतले होते. सिनेसृष्टीसाठीही २०२० हे वर्ष वाईट गेले आहे. मागील वर्षी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण फारच गाजले होते. यानंतर आता टीव्ही जगतातील आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्याने आत्महत्या केली आहे. आपल्या राहत्या घरी अभिनेत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. परंतु त्याच्या आत्महत्येचे कारण अजूनही अस्पष्ट आहे. टीव्ही इंडस्ट्री तसेच सिनेसृष्टीतील कलाकारांच्या आत्महत्या करण्याचे प्रमाण खूप वाढल्याचे दिसते. याचे अनेक कारणे असल्याचे बोलले जाते. कामाचा ताण, निराशा, टेंन्शन, नैराश्य अशा अनेक कारणांमुळे कलाकारांची आत्महत्या होत असल्याचे बोलले जात आहे.

आत्महत्या केलेल्या कलाकाराचे नाव श्रीवास्तव चंद्रशेखर असे आहे. हा अभिनेता दाक्षिणात्य सिनेसृष्टीत कलाकार आहे. चंद्रशेखरने आपल्या राहत्या घरी ४ फेब्रुवारीला आत्महत्या केली आहे. त्याचा मृतदेह घरात लटकलेल्या अवस्थेत आढळला आहे. या अभिनेत्याचे आत्मह्त्या करण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी या प्रकरणात तपास सुरु केला आहे.

- Advertisement -

चंद्रशेखर श्रीवास्तव हा वल्लमई थारायो या वेबसीरीजमध्ये होता. या अभिनेत्याने दाक्षिणात्या सुपरस्टार धनुषसह सुद्धा काम केले आहे. २०१९ साली रिलीज झालेल्या एनई नोकी पायुम थोट्टा मध्ये चंद्रशेखर हा धनुषचा सहकलाकार होता.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -