घरमनोरंजनप्रेग्नेंसीमध्ये अनुष्काच शीर्षासन

प्रेग्नेंसीमध्ये अनुष्काच शीर्षासन

Subscribe

फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बॉलिवुडची लाडकी जोडी म्हणजेच अनुष्का आणि विराट कोली. हे दोघेही आता आई बाबा होणार आहेत. दरम्यान अनुष्काच्या प्रेग्नंसीची सगळीकडे चर्चा केली जात आहे. अनुष्का तिच्या प्रेग्नंसीच्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असते. अनुष्काने नुकताच एक फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यात ती चक्क शीर्षासन करताना दिसत आहे. तर विराट कोहली तिला मदत करताना दिसत आहे. यात अनुष्काचे बेबी बंप दिसत आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

- Advertisement -

हा फोटो शेअर करत अनुष्काने लिहिले आहे की, हा योगा सर्वात कठीण योगा प्रकार आहे. यात हात खाली आणि पाय ठेवून करायचा सर्वात कठीण योगा प्रकार आहे. योगा हा माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा भाग आहे. मी प्रेग्नंसीच्या पूर्वी अशी योगासने करू शकते. माझ्या डॉक्टरांनी मला योग्य आणि आवश्यकतेनुसार सूचन दिल्या आहेत. प्रेग्नंसीच्या दिवसात शीर्षासन करताना मी सुरक्षिततेसाठी भिंतीचा वापर केला आहे. त्याचबरोबर माझ्या सक्षम पतीने देखिल मला मदत केली. अनुष्काने पुढे असे लिहिले आहे की, हे शीर्षासन मी माझ्या योगा टिचरकडून शिकले आहे. त्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे. प्रेग्नंसीच्या काळातही मी माझा योगअभ्यास सुरू ठेवला आहे.

अनुष्काने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोवर चाहत्यांनी लाइक्सचा पाऊस पाडला आहे. विरूष्काच्या चाहत्यांनी त्यांना अनेक शुभेच्छा दिल्या आहेत. अनुष्काच्या प्रेग्नंसी योगाचा हा फोटो सोशल मीडियटावर प्रचंड व्हायरल होत आहे. अनुष्का आणि विराट पहिल्यांदा आई वडिल बनणार आहेत. अनुष्काचा प्रेग्नंसीच्या दिवसात अनुष्का खूप एक्टिव दिसून येत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Bigg Boss 14: निक्कीला १९व्या वर्षी केलं होत किडनॅप!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -