घरमनोरंजनकृती सेननला आवडतो प्रभास? सोशल मीडियावर चर्चांना उधाण

कृती सेननला आवडतो प्रभास? सोशल मीडियावर चर्चांना उधाण

Subscribe

करण जौहरच्या 'कॉफी विथ करण 7'मध्ये सहभागी झाली होती त्यावेळी एक खेळ खेळताना कृति सेननने सर्वात आधी फोन प्रभासला लावला होता. त्यानंतर दोघांमध्ये काही बोलणं झालं.

टॉलिवूड अभिनेता प्रभास आणि बॉलिवूड अभिनेत्री कृति सेनन सध्या त्यांच्या ‘आदिपुरूष’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. याचं दरम्यान, कृति सेनन आणि प्रभास हे दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. मागील काही दिवसांपूर्वी जेव्हा कृति सेनन, करण जौहरच्या ‘कॉफी विथ करण 7’मध्ये सहभागी झाली होती त्यावेळी एक खेळ खेळताना कृति सेननने सर्वात आधी फोन प्रभासला लावला होता. त्यानंतर दोघांमध्ये काही बोलणं झालं. तेव्हापासून या दोघांचे अफेयर चालू असल्याच्या चर्चा सुरू झाल्या.

नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, कृति सेनन आणि प्रभास दोघेही एकमेकांशी सेटवर लवकर जोडले गेले आहेत. दोघेही सेटवर एकमेकांसोबत जास्त वेळ एकत्र घालवणं पसंत करतात. तसेच शूट संपल्यानंतर देखील दोघे फोन कॉल्स आणि मॅसेजद्वारे संपर्कात असतात. ज्यातून सिद्ध होतं की, दोघं एकमेकांशी जास्तच कनेक्ट झाले आहेत. मात्र दोघांनीही त्यांच्या नात्याबाबत काहीही खुलासा केला नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kriti (@kritisanon)

- Advertisement -

दरम्यान, प्रभास पूर्वी कृति सेननचं नाव बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्यांबरोबर जोडलं गेलं आहे. सर्वात आधी कृतिचं नाव अभिनेता सुशांत सिंहसोबत देखील जोडलं गेलं होतं. त्यानंतर कृतिचं नाव कार्तिक आर्यनसोबत देखील जोडलं जात होतं. तसेच प्रभासचं नाव टॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शेट्टीसोबत देखील जोडलं गेलं होतं. मात्र प्रभासने आम्ही चांगले मित्र आहोत असं म्हणत चर्चांना पूर्णविराम दिला होता.

रामायणावर आधारित असणार ‘आदिपुरूष’
‘आदिपुरुष’ चित्रपटात प्रभास श्रीरामांची आणि कृति सेनन सीतेची भूमिका साकारणार आहे. तसेच अभिनेता सनी सिंग लक्ष्मणच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात सैफ अली खान रावणाची भूमिका साकारताना दिसणार आहे. सुरुवातीला सैफ अली खानच्या या व्यक्तिरेखेला खूप विरोध झाला होता. परंतु या चित्रपटातील त्याची भूमिका पाहण्यासाठी सैफचे चाहतेही आता खूप उत्सुक आहेत.

- Advertisement -

हेही वाचा :

…म्हणून अमिताभ बच्चन यांच्या घराचे नाव ‘प्रतीक्षा’ आहे

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -