घरमनोरंजन‘अवतार 2’च्या गल्ल्यात झपाट्याने वाढ; ‘सर्कस’, ‘दृश्यम 2’च्या कमाईत घसरण

‘अवतार 2’च्या गल्ल्यात झपाट्याने वाढ; ‘सर्कस’, ‘दृश्यम 2’च्या कमाईत घसरण

Subscribe

नवीन वर्ष सुरु होऊन आता एक आठवडा पूर्ण झाला. मागील काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांच्या कमाईत देखील झपाट्याने वाढ झालेली पाहायला मिळत आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात प्रेक्षकांनी चित्रपटगृहाकडे धाव घेतली. त्यामुळे नुकत्याच काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘सर्कस’, ‘अवतार 2’ आणि ‘दृश्यम 2’ या चित्रपटांच्या कमाईत वाढ झालेली आहे.

अवतार 2' ने इंडिया में 200 करोड़ कमा कर बनाए रिकॉर्ड, बॉलीवुड की टॉप फिल्मों को कर सकती है पार! - avatar 2 8 day india box office collection 4th highest for

- Advertisement -

‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ने कमावले इतके कोटीजेम्स कॅमरुनच्या या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर प्रदर्शनाच्या पहिल्या आठवड्यात 193.6 कोटी कमावले. तर दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाने 100 कोटी कमावले होते. तर तिसऱ्या आठवड्यात चित्रपटाने 59.85 कोटी कमावले असून चौथ्या आठवड्यातील शुक्रवारी चित्रपटाने 4.19 कोटी कमावले दरम्यान आत्तापर्यंत या चित्रपटाने एकूण 364.14 कोटी कमाई केली आहे.

सर्कस

- Advertisement -

रणवीर सिंहच्या ‘सर्कस’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 6 कोटींची कमाई केली असून दुसऱ्या दिवशी 6.50 कोटींची कमाई केली तर तिसऱ्या दिवशी 8.2 कोटी आणि चौथ्या दिवशी 2.25 कोटी कमावले होते. पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने एकूण 30.25 कोटी तर दुसऱ्या आठवड्यात 36.82 कोटी कमावले. शुक्रवारी या चित्रपटाने केवळ 30 लाखांची कमाई केली.आत्तापर्यंत या चित्रपटाने 97.7 कोटी कमावले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, निर्मात्यांनी हा चित्रपट तयार करण्यासाठी एकूण 150 कोटींचा खर्च केला आहे. हा चित्रपट रोहित शेट्टीच्या इतर चित्रपटांच्या तुलनेत कमी कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

दृश्यम 2

श्रिया सरन, अक्षय खन्ना आणि अजय देवगण यांचा ‘दृश्यम 2’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर करोडोंची कमाई केली आहे. 18 नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या आठवड्यात 102 कोटी कमावले. तर दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाने 57.16 कोटी कमावले होते. तर तिसऱ्या आठवड्यात चित्रपटाने 31.82 कोटी कमावले असून चौथ्या आठवड्यात 19.4 कोटी कमावले पाचव्या आठवड्यात चित्रपटाने 8.97 कोटी कमावले तर सहाव्या आठवड्यात चित्रपटाने 6 कोटी, सातव्या आठवड्यात चित्रपटाने 6.06 कोटी कमावले एकूण आत्तापर्यंत या चित्रपटाने 236.76 कोटी कमावले होते.

शिवाय आत्तापर्यंत एकूण या चित्रपटाने 35 कोटींचा आकडा पार केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निर्मात्यांनी हा चित्रपट तयार करण्यासाठी एकूण 150 कोटींचा खर्च केला आहे. हा चित्रपट रोहित शेट्टीच्या इतर चित्रपटांच्या तुलनेत कमी कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.


हेही वाचा :

रितेश देशमुखचा प्रश्न अन् करिना कपूरने चक्क मराठीतून दिलं उत्तर; म्हणाली, ‘वेड म्हणजे’

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -