घरमनोरंजनबॉलीवूड अभिनेत्रींचे साऊथ कनेक्शन

बॉलीवूड अभिनेत्रींचे साऊथ कनेक्शन

Subscribe

 

बॉलीवूडच्या अभिनेत्रींसाठी तेलुगू, तामिळ, कन्नड आणि मल्यायम ही साऊथ इंडस्ट्री नेहमीच आकर्षणाचा विषय ठरला आहे. साऊथ सुपरस्टार्ससह बॉलीवूडमधील बऱ्याच अभिनेत्रींनी काम केलंय. तर सध्या नव्या नव्या अभिनेत्री साऊथमधील चित्रपटात काम करत आहेत. बॉलीवूडमधील चित्रपटातील नायकांनंतर साऊथमधील नायकांना प्रेक्षकांची जास्त पसंती असते. रजनीकांत, महेश बाबू, अलू अर्जुन, प्रभुदेवा यांचं फॅनफॉलोईंग प्रचंड आहे. त्यामुळे बॉलीवूडमधील अभिनेत्री तरी मागे कशा राहतील? तर जाणून घेऊयात सध्या कोणत्या अभिनेत्री साऊथ सुपरस्टार्ससह कोणते चित्रपट करत आहेत.

- Advertisement -

सगळे रेकॉर्ड्स तोडणारा भारत अने नेनू या चित्रपटात महेश बाबूची अभिनेत्री म्हणून बॉलीवूडमधील कियारा अडवाणीने आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. तर सध्या प्रभुदेवाबरोबर चार्ली चॅप्लिन २ या तामिळ चित्रपटात अदा शर्मा ही अभिनेत्री झळकणार आहे. सध्या या चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे. टायगर श्रॉफसह बॉलीवूडमध्ये प्रवेश करणारी निधी अगरवाल सध्या तेलुगू चित्रपट सव्यासाचीमधून नागा चैतन्यसह पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. तर ‘बाहुबली’फेम प्रभासबरोबर श्रद्धा कपूर साहोमधून प्रेक्षकांसमोर येणार आहे. साहो हा चित्रपट तीन विविध भाषांमध्ये एकाच वेळी प्रदर्शित होणार आहे.

यासंदर्भात आपलं मत व्यक्त करताना निधीने सांगितले की, “नागाचैतन्यसारख्या हुशार कलाकाराबरोबर काम करायला मिळणं ही आनंदाची गोष्ट आहे. पण त्यांच्या अभिनय कौशल्याला मॅच करणं हे एक प्रकराचं दडपण आणि मोठी जबाबदारी असते असं मला वाटतं.” तर महेश बाबूबरोबर काम करण्याचा अनुभव सांगताना कियारा म्हणाली, “महेश बाबू हा अतिशय नम्र कलाकार असून तो तुमचं काम चांगलं होण्यासाठी संपूर्ण पाठिंबा देतो.”
यापूर्वीदेखील प्रेक्षकांनी दाक्षिणात्य चित्रपटात रजनीकांत – सोनाक्षी सिन्हा – दीपिका पदुकोण, क्रिती सनॉन – महेश बाबू, प्रभास – कंगना रणौत या जोड्यांना पसंती दर्शवली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -