दिशा पटानीच्या ब्लॅक स्ट्रॅपलेस ड्रेसमधील सिझलिंग लूकने चाहते फिदा!

बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक असलेली दिशा पटानी सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. पर्सनल लाईफचे अपडेट आपल्या चाहत्यांना सतत देऊन ती तिच्या फॅन्सशी कनेक्ट असते. ती नेहमी तिचे बोल्ड फोटो पोस्ट करत असते आणि त्याला चाहते सर्वाधिक पसंती देत असतात. ते बोल्ड फोटो क्षणार्धात व्हायरल होताना दिसतात. गेल्या काही दिवसांपूर्वी दिशा तिच्या बिकिनी फोटोमुळे चांगलीच चर्चेत होती. परंतु आता दिशा एका वेगळा अंदाजात आणि सिझलिंग लूकमध्ये दिसतेय. दिशाचा हा सिझलिंग लूक पाहून चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत. दिशाने इंस्टाग्रामवर तिचे ब्लॅक गाऊनमधील फोटो शेअर केले आहेत. या फोटोवर चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत मात्र यासोबतच अभिनेता टायगर श्रॉफने देखील प्रतिक्रिया देत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani)

दिशाने इंस्टावर शेअर केलेल्या फोटोमध्ये ती ब्लॅक स्ट्रॅपलेस ड्रेसमध्ये दिसतेय. दिशा बसलेली असून तिच्या केसातून ती हात फिरवताना दिसतेय. दिशाच्या या दिलखेचक अंदाजाच्या लूकला चाहत्यांकडून चांगलीच पसंती मिळतेय. या पोस्टवर प्रतिक्रिया करताना टायगर श्रॉफने फायर अँड हार्टचे इमोटिकॉन दिले आहे. टायगरच्या या प्रतिक्रियेवर एका युजरने लिहिले- ‘टायगर जिंदा है.’ दिशाचे कौतुक करताना एका चाहत्याने म्हटले- ‘माझा क्रश.’

 

View this post on Instagram

 

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani)

दिशाने हा फोटो सेलिब्रिटी स्टायलिस्ट आस्था शर्माला टॅग केले आहे. दिशाचा हा फोटो प्रसिद्ध छायाचित्रकार साशा जयराम यांनी क्लिक केला आहे. दिशा नुकतीच ‘राधे’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात ती सलमान खानच्या विरुद्ध होती. अभिनेत्री लवकरच ‘एक व्हिलन रिटर्न्स’ चित्रपटात दिसणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी दिशाने आणखी काही फोटो शेअर केले आहे. या फोटोमध्ये दिशा हॉट लूकमध्ये दिसत होती. दिशाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटद्वारे गुलाबी रंगाच्या बिकिनीमध्ये तिचे फोटो शेअर केले आहे. हे फोटो पाहून सोशल मीडिया युजर्सनी दिशाच्या फिटनेस आणि तिच्या हॉट स्टाईलीश लूकचे कौतुक केले होते.