घरताज्या घडामोडीकॅटच्या नव्या हॉरर कॉमेडी चित्रपटच्या शूटिंगला सुरुवात

कॅटच्या नव्या हॉरर कॉमेडी चित्रपटच्या शूटिंगला सुरुवात

Subscribe

यंदाच्या २०२० वर्षात कोरोना महामारीमुळे चित्रपटसृष्टीवर खूप परिणाम झाला. कित्येक महिने चित्रपटाची शूटिंग करणे थांबले होते. पण आता कोरोना संदर्भातील सर्व नियम पाळून अनेक चित्रपटच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. शनिवारपासून अभिनेत्री कॅटरिना कॅफ, अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टरच्या हॉरर कॉमेडी चित्रपट ‘फोन भूत’च्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. याबाबतची माहिती चित्रपट निर्मात्याने आपल्या सोशल मीडियावरील अकाऊंटच्या माध्यमातून दिली आहे. या नवा हॉरर कॉमेडी चित्रपट २०२१ मध्ये प्रदर्शित होण्याची योजना आहे.

या चित्रपटाची निर्मिती फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी करत आहे. शनिवारी सिधवानीने इन्स्टाग्रामवर क्लॅपबोर्डचा फोटो शेअर केला आहे असून कॅटरिना कॅफ, सिद्धांत चतुर्वेदी, ईशान खट्टर, फरहान अख्तर अशा अनेकांचा पोस्ट टॅग केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ritesh Sidhwani (@ritesh_sid)

- Advertisement -

गेल्या जुलै महिन्यात हा चित्रपट २०२१मध्ये प्रदर्शित होण्याची घोषणा केली होती. या चित्रपटाची संपूर्ण कहाणी कॅटरिना कॅफ, सिद्धांत आणि ईशानच्या भूमिके भोवती फिरणारी आहे. या चित्रपटातील हे कलाकार भूतला पकडताना दिसणार आहेत. या चित्रपटाची पटकथा ज्याप्रकारे आहे, त्यावरून या चित्रपटात कॉमेडी पाहायला मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कॅटरिना कॅफ या चित्रपटात मुख्य भूमिकेत असणार आहे.


हेही वाचा – अजय देवगणच्या ‘मैदान’ चित्रपटाचा पोस्टर रिलीज, प्रदर्शनाची तारीख बदलली

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -