घरताज्या घडामोडीBollywood Drug Connection: अर्जुन भारत सोडण्याच्या तयारीत असल्याचे NCBच्या चौकशीत उघड!

Bollywood Drug Connection: अर्जुन भारत सोडण्याच्या तयारीत असल्याचे NCBच्या चौकशीत उघड!

Subscribe

अर्जुन रामपाल प्रकरणाची एनसीबीची चार्जशीट दाखल

काही महिन्यांपूर्वी नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) मुंबई युनिटने बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी अभिनेता अर्जुन रामपालच्या घरावर छापा टाकला होता. या छापेमारी दरम्यान एनसीबी अधिकाऱ्यांनी त्याच्या घरातून काही औषधं जप्त केली होती. अलीकडेच एनसीबीने चार्जशीट दाखल केली होती. त्यामध्ये एनसीबी अजूनही अर्जुन रामपालला संशयित मानत असून अर्जुन दक्षिण आफ्रिकेला पळून जाऊ शकतो, असा संशय चार्जशीटमध्ये व्यक्त केला आहे. याबाबतचे वृत्त एबीपी न्यूज या हिंदी वृत्तसंस्थेने दिले आहेत.

चार्जशीटनुसार, एनसीबीच्या मुंबई युनिटने ३ डिसेंबर २०२०ला रिपब्लिक ऑफ दक्षिण आफ्रिकेच्या काउंसलेट जनरलला पत्र लिहिले होते. ज्यामध्ये म्हटले होते की, ‘एनसीबीने ज्या प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक केली होती, त्याच प्रकरणी अर्जुन रामपाल पण एक संशयित आहे. त्यामुळे अर्जुन रामपाल भारत सोडून पळून जाऊन तो दक्षिण आफ्रिकेला जाऊ शकतो,’ असा संशय एनसीबीला आहे.

- Advertisement -

एनसीबीने या पत्रात पुढे म्हटले आहे की, ‘अर्जुन रामपालच्या पत्नीचा भाऊ अगिसीआलोस डिमेट्रिएड्स एनसीबीने दोन प्रकरणी अटक केली आहे. अगिसीआलोस स्वतः दक्षिण आफ्रिकेचा नागरिक आहे. त्यामुळे जर अर्जुन रामपालने विजासाठी अर्ज केला तर योग्य कायद्यानुसार निर्णय घेतला जावा.’ यानंतर एनसीबीने अर्जुन रामपाल एनडीपीएस कलम ६७ अंतर्गत १४ डिसेंबर समन्स बजावून त्याला १६ डिसेंबर स्टेटमेंट देण्यासाठी हजर राहण्यास सांगितले होते.

चौकशीदरम्यान अर्जुन रामपालने एनसीबीला सांगितले की, ‘जी औषधं एनसीबीने जप्त केली होती, ती त्याच्या कुत्र्याची आणि बहीणीची ANXIETYची औषधं होती. एनसीबी गेल्या अनेक महिन्यापासून बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी तपास करत आहे. यादरम्यानच अर्जुन रामपालवर एनसीबीची करडी नजर होती. अर्जुन रामपालला सतत एनसीबीने कार्यालयात बोलवून त्याची कसून चौकशी केली.

- Advertisement -

हेही वाचा – Fact Check : अजय देवगणला मारहाणीच्या व्हायरल व्हिडिओवर अभिनेत्याचा खुलासा


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -