घरताज्या घडामोडीसपना चौधरीचा 'हा' डान्स ठरला सर्वात हिट

सपना चौधरीचा ‘हा’ डान्स ठरला सर्वात हिट

Subscribe

अभिनेत्री, सिंगर आणि स्टार डान्सर सपना चौधरीचा सर्वात हीट झालेला डान्स.

आपल्या नृत्यकलेने थोड्याच कालावधीत लोकांना वेड लावणारी डान्सर सपना चौधरी जेव्हा स्टेजवर येते तेव्हा आपल्या ठुमक्यांनी सर्वांनाच वेड लावून जाते. तिचा स्टेजवरील प्रत्येक डान्स पाहण्यासाठी चाहते एकच गर्दी करतात. मग तो जुन्या गाण्यावरील डान्स असो किंवा नवीन गाण्यावरील असो. त्याचप्रमाणे सपना चौधरीचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतात आणि तिचे चाहते ते आवर्जून पाहतात देखील. त्यातीलच एक व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला पाहिला मिळाला आहे. विशेष म्हणजे आतापर्यंतच्या सर्व डान्समधील हा डान्स सर्वात हटके आणि हिट ठरला आहे. तसेच हा व्हिडीओ आतापर्यंत ८०० मिलियन लोकांनी पाहिला आहे.

यूट्यूबवर सपना चौधरीच्या ‘या’ डान्सची हवा

सध्या यूट्यूबवर सपना चौधरीच्या डान्सचा एक व्हिडीओ चांगलाच गाजत आहे. या व्हिडीओमध्ये सपनाने आइकॉनिक सॉन्ग ‘तेरी आंख्या का यो काजल’ वर डान्स करत आहे. या गाण्यावर तिने आपल्या ठुमक्यांनी सर्वांना वेड लावले आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत ८०० मिलियन लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडीओ सोनाटेक कंपनीच्या यूट्यूब चॅनलवर प्रसिद्ध करण्यात आला असून या व्हिडीओला आतापर्यंत ४९० मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

- Advertisement -

सपना विषयी थोडक्यात…

सपना चौधरीची ख्याती आता फक्त उत्तर प्रदेश, हरियाणा, बिहारपर्यंतच मर्यादित राहिलेली नाही. बिग बॉस ११ मध्ये प्रवेश केल्यानंतर तिच्या स्टार व्हॅल्यूमध्ये चांगलीच वाढ झाली. ती अनेक सिनेमांमध्ये आणि सेलिब्रिटी इव्हेंटमध्ये आवर्जुन दिसू लागली. तसेच सपना तिच्या निर्भीड व्यक्तिमत्त्वासाठी ओळखली जाते. ती फक्त आपल्या मनाचे ऐकते आणि बिंधास्त जगते.

- Advertisement -

हेही वाचा – Lockdown – ‘राणादा’मध्ये नाही तर पाठकबाईंचा जीव ‘या’ मध्ये रंगलाय!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -