घरमनोरंजनबॉलिवूड निर्माते नितिन मनमोहन यांचे निधन

बॉलिवूड निर्माते नितिन मनमोहन यांचे निधन

Subscribe

बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माते नितिन मनमोहन यांचे आज निधन झाले आहे. मागील काही दिवसांपूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती खूप गंभीर असल्याचं सांगितलं जात होत त्यामुळे ते मागील अनेक दिवसांपासून व्हेंटीलेटरवर होते. दरम्यान, आज सकाळी त्यांनी वयाच्या 60 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे.

हृदयविकाराचा आला होता झटका

- Advertisement -

नितिन मनमोहन यांना 3 डिसेंबर रोजी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर उपचारासाठी त्यांना कोकिळाबेन धीरुबाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली नाही. त्यामुळे व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

‘या’ प्रसिद्ध चित्रपटांची केली निर्मिती
नितिन मनमोहन बॉलिवूडमधील लोकप्रिय चित्रपट निर्माते होते. त्यांचे वडील प्रसिद्ध अभिनेते होते. नितिन यांनी देखील अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती केली. ‘बोल राधा बोल’, ‘लाडला’, ‘दस’, ‘यमला पगला दीवाना, ‘आर्मी स्कूल’, ‘लव के लिए कुछ भी करेगा’, ‘चल मेरे भाई’, ‘महा-संग्राम’, ‘इंसाफ: द फाइनल जस्टिस’, ‘दीवानगी’, ‘नई पड़ोसन’, ‘अधर्म’, ‘बाघी’, ‘ईना मीना डीका’, ‘तथास्तु’ यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली होती.

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -