घरताज्या घडामोडी'राधे' चित्रपट राज्यात २ चित्रपटगृहात प्रदर्शित; पहिल्या दिवशी ८४ तिकिटांचीच विक्री

‘राधे’ चित्रपट राज्यात २ चित्रपटगृहात प्रदर्शित; पहिल्या दिवशी ८४ तिकिटांचीच विक्री

Subscribe

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि दिशा पटानीचा चित्रपट ‘राधे: युआर मोस्ट वाँटेड भाई’ यावर्षी १३ मेला प्रदर्शित झाला. पण कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. पण आता महाराष्ट्रात लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर २ चित्रपटगृहात राधे प्रदर्शित करण्यात आला. पण पहिल्याच दिवशी या चित्रपटाचे ८४ तिकिटे विक्री झाली झाल्याचे समोर आले.

कोरोना आणि दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात कठोर नियम लागू करण्यात आले होते. पण आता लॉकडाऊन पाच टप्प्यात शिथिल करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पहिल्या टप्पात आणि दुसऱ्या टप्प्यात असलेल्या शहरांमध्ये चित्रपटगृह उघडण्यास परवानगी दिली. यामुळे महाराष्ट्रातील दोन चित्रपटगृहात सलमानचा राधे प्रदर्शित करण्यात आला. याबाबत इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये चित्रपट पाहणाऱ्याचा फोटो पोस्ट केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zee Studios (@zeestudiosofficial)

- Advertisement -

या पोस्टमधून दिलेल्या माहितीनुसार, राधे चित्रपट मालेगाव आणि औरंगाबादच्या चित्रपटगृहात दाखवला गेला. मालेगावात राधे चित्रपटाचे २ शो दाखवण्यात आले. तर औरंगाबादच्या चित्रपटाचे दिवसाला ४ वेळा शो दाखवण्यात आले. एका रिपोर्टनुसार, ७.३० वाजताच्या शोसाठी ड्राईव्ह इन चित्रपटामध्ये २२ लोकं उपस्थित होते. तर ४० लोकांनी खुर्चीवर बसून चित्रपट पाहिला. तसेच चित्रपटगृहाच्या मॅनेजरने सांगितले की, ‘९.३० वाजताचा शो रद्द करावा लागला, कारण कोणीचा पाहायला आले नव्हते.’

तर औरंगाबादच्या सिनेप्लेक्सच्या मॅनेजर सुभाष कोटेचा म्हणाले की, ‘शोची २२ तिकीटे विक्री झाली. ४ पैकी २ शो रद्द करण्यात आले होते.’

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -