घरताज्या घडामोडीसुष्मिता सेनच्या घरी आली नवी पाहुणी

सुष्मिता सेनच्या घरी आली नवी पाहुणी

Subscribe

अभिनेत्री सुष्मिता सेनच्या घरी नवी पाहुणी आल्याची गोड बातमी समोर आली आहे. सुष्मिता सेनची वहिणी आणि टेलिव्हिजनवरील अभिनेत्री चारुने ही गोड बातमी दिली आहे. चारुने एका गोंडस मुलगी जन्माला घातली आहे. या गुड न्यूजची माहिती स्वतः चारुने आपल्या इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करून दिली आहे. चारुने मुलीचा पहिला फोटो शेअर केला आहे.

काही वेळापूर्वी चारुने आपल्या चिमुकल्या मुलीची पहिली झलक चाहत्यांसाठी शेअर केली. या फोटोंमध्ये रुग्णालयात चारु आपल्या चिमुकल्या मुलीला खुशीत घेतलेली दिसत आहेत. तसेच चारुचा पती राजीव सेन देखील फोटोमध्ये दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये पती राजीव चारुला किस करताना दिसत आहे. त्याने लिहिले आहे की, ‘एका मुलीचे आई-वडील होण्याचा आनंद. तुम्ही केलेल्या प्रार्थंनासाठी सर्वांचे धन्यवाद. देवाचे आभार’

 

View this post on Instagram

 

A post shared by Charu Asopa Sen (@asopacharu)

- Advertisement -

सुष्मिता सेनने देखील या आनंदाच्या बातमी निमित्ताने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात लिहिले आहे की, ‘दिवाळीच्या अगोदर आमच्या घरी लक्ष्मी आली.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

चारुने यावर्षी मे महिन्यात गर्भवती असल्याचे जाहीर केले होते. एका मुलाखतीमध्ये चारुने याबाबतची माहिती दिली होती. ती म्हणाली होती की, ‘राजीव आणि मी बऱ्याच काळापासून बेबी प्लॅन करत होतो. परंतु ही गोष्ट आपल्या प्लॅनिंगनुसार कधीच होत नाही, हे तुम्हाला माहित आहे. जेव्हा आम्ही हार मानली, तेव्हा आम्हाला एक सरप्राईज मिळाले. मला चौथ्या आठवड्यात एक प्रेग्नेंसीची चाचणी करावी असे वाटले. पहिली चाचणी निगेटिव्ह आली होती, पण दुसरी चाचणी पॉझिटिव्ह आली.’

- Advertisement -

२०१९मध्ये चारुने सुष्मिता सेनचा छोटा भाऊ राजीव सेनसोबत लग्न केले होते. दोघांच्या ग्रँड वेडिंगला अनेक सेलिब्रिटी उपस्थितीत राहिले होते. माहितीनुसार, दोघांनीही तीन वेळा केले. पहिल्यांदा लग्न गोव्याला झाले, त्यानंतर राजस्थानी परंपरेनुसार दुसऱ्यांदा लग्न केले आणि पुन्हा रजिस्टर्ड मॅरिज केले होते.


हेही वाचा – यातील राज कुंद्रा कोणता? श्वानांसोबतच्या फोटोमुळे शिल्पा शेट्टी ट्रोल


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -