घरताज्या घडामोडीPushpa: चाहत्यांसोबत सेलिब्रेटींमध्येही अल्लू अर्जुनच्या सिनेमाची क्रेझ

Pushpa: चाहत्यांसोबत सेलिब्रेटींमध्येही अल्लू अर्जुनच्या सिनेमाची क्रेझ

Subscribe

अनेक सेलिब्रेटींनी सोशल मीडियावर सिनेमाचे पोस्टर शेअर करत सिनेमाविषयीची आतुरता आणि सिनेमाप्रती प्रेम व्यक्त केले

अभिनेता अल्लू अर्जुनचा पुष्पा हा सिनेमा रिलीज होण्यासाठी काही तास उरले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सिनेमाची सर्वत्र जोरदार चर्चा होती. नुकताच सिनेमाच्या संपूर्ण टीमने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अल्लू अर्जुननेथेट मराठीत संवाद साधला. सगळ्यांना माझा नमस्कार असे म्हणत अल्लू अर्जुने सर्वांची मने जिंकली. अल्लू अर्जुनच्या पुष्पा या सिनेमासाठी आजवर रसिक प्रेक्षक आतूर होते मात्र आता सेलिब्रेटी देखील पुष्पा या सिनेमाची फार आतुरतेने वाट पाहत आहेत. अनेक सेलिब्रेटींनी सोशल मीडियावर सिनेमाचे पोस्टर शेअर करत सिनेमाविषयीची आतुरता आणि सिनेमाप्रती प्रेम व्यक्त केले आहे. उद्या म्हणजेच १७ डिसेंबरला हा सिनेमाला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

- Advertisement -

अल्लू अर्जुनच्या पुष्पा हा बहुप्रतिक्षीत सिनेमाची प्रेक्षक अनेक दिवसांपासून वाट पाहत होते. अल्लू अर्जुनने सिनेमात भारदस्त अभिनयाने कमाल केली आहे. अभिनेता साई धरम तेज याने सोशल मीडियावर अल्लू अर्जुनसोबतचा फोटो शेअर करत अल्लूने सिनेमासाठी घेतलेल्या मेहनतीविषयी त्याचे तोंडभरुन कौतुक केले आणि सिनेमाला शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

 

- Advertisement -

साई धरम तेजने ट्विट करत असे म्हटले आहे की, एका चांगल्या आशयाच्या सिनेमासाठी पुष्पा सिनेमाच्या संपूर्ण टीमने प्रचंड मेहनत आणि कष्ट घेतले आहेत. त्यांच्या या मेहनीचा मोबदला त्यांना सिनेमा रिलीज झाल्यानंतर नक्की मिळेल अशी मला आशा आहे. सलाम सुकुमारन सर आणि देवी प्रसाद सोबतच रश्मिका मंदाना यांनी सिनेमात दिग्दर्शनाची उत्तम धुरा सांभाळली आहे. सिनेमाच्या संपूर्ण टीमला माझ्या मनापासून शुभेच्छा.

साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा याने देखील पुष्पा सिनेमाचे पोस्टर शेअर करत सिनेमा पाहण्यासाठी तो उत्साही असल्याचे त्याने म्हटले. सिनेमाचा ट्रेलर, गाणी, व्हिज्युअल्स, कलाकारांचा अभिनय सगळ्या गोष्टी उत्तम आहेत. पुष्पामुळे तेलुगू सिनेमा एका वेगळ्या उंचीवर दिसणार आहे . सिनेमाला माझ्या खूप खूप शुभेच्छा सिनेमा हिट होणार यात काही शंका नाही.

त्याचप्रमाणे अभिनेता संदीप किशनने देखील अल्लू अर्जुनच्या पुष्पा सिनेमाचे पोस्टर शेअर केले आहे. संदीपनेअल्लू अर्जुन आणि सुकुमार या माझ्या आवडत्या जोडीला एकत्र पाहण्यासाठी मी उत्साही असल्याचे म्हटले आहे.


हेही वाचा – Spider Man No Way Home: प्रेक्षकांची क्रेझ पाहून थिएटर्सनी बदलली शोची वेळ, तिकिटाची किंमत तर पहा

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -