घरमनोरंजनचिन्मय मांडलेकर, मंगेश देसाई, लोकेश गुप्ते देणार हिंदीत ‘दस्तक’

चिन्मय मांडलेकर, मंगेश देसाई, लोकेश गुप्ते देणार हिंदीत ‘दस्तक’

Subscribe

क्राईम पेट्रोल- दस्तक ही मालिका नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला येत असून यामध्ये मराठी कलाकार चिन्मय मांडलेकर, मंगेश देसाई, लोकेश गुप्ते सूत्रधाराच्या भूमिकेत दिसणार आहेत.

गुन्हेगारी पार्श्वभूमीवर आधारीत ‘क्राईम पेट्रोल- दस्तक’ या मालिकेत आता मराठीतील दमदार कलाकारांना पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. सोनी वाहिनीवर दाखवण्यात येणारी ही मालिका आता नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये मराठीतील आघाडीचे अभिनेते चिन्मय मांडलेकर, मंगेश देसाई, लोकेश गुप्ते सूत्रधार आणि पोलिसाच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे हिंदी मालिकेत मराठमोळे चेहरे दिसणार असून प्रेक्षकांनाही त्यांच्या अभिनयाची झलक पाहता येणार आहे.

नवीन थीम, नवी टीम सज्ज

हत्या, दरोडे, फसवणून, अपहरण या आणि अशा विविध घटनांची सविस्तर गोष्ट या मालिकेत दाखवली जाते. खऱ्या घटनांवर आधारीत ही मालिका आहे. गेली दीड दशकं रसिकांच्या मनावर गारुड करणारी ही मालिका ‘क्राईम पेट्रोल- दस्तक’ नव्या ढंगात येणार असून नवी थीम आणि नवी टीम यासाठी सज्ज झाली आहे. गुन्हे कधीच सांगून घडत नाहीत. सध्याचा काळ कठीण आहे आणि गुन्हे चारही बाजूंनी घडत आहेत. या काळात सतर्कता हेच आपले शस्त्र आहे. जेव्हा मनात संशय डोकावतो तेव्हा सावध व्हा आणि त्या संशयाचा पाठपुरावा करा. गुन्हे घडण्यापासून रोखण्याचा आणि स्वत:सोबतच आपला समाज सुरक्षित ठेवण्याचा हाच एकमेव उपाय आहे. अशा या नव्या कथासूत्रात बांधलेल्या वास्तवदर्शी कथा घेऊन ‘क्राईम पेट्रोल- दस्तक’ नव्याने प्रेक्षकांसमोर येत आहे.

- Advertisement -

मराठी कलाकारांचे हिंदीतही अमूल्य स्थान

अभिनय क्षेत्रामध्ये मराठी कलाकार किती मातब्बर असतात याचा वेळोवेळी प्रत्यय प्रेक्षकांना आला आहे. मराठी मालिक, चित्रपट आणि नाटकांमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवल्यानंतर हे कलाकार हिंदी वाहिन्यांवरही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसतात. येत्या काही दिवसांमध्ये नव्याने दाखल होणाऱ्या बहुतांश मालिकांमध्ये मराठी अभिनेता आणि अभिनेत्री प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत. त्यामुळे चिन्मय मांडलेकर, लोकेश गुप्ता आणि मंगेश देसाई यांच्याही व्यक्तीरेखा छोट्या पडद्यावर पसंत केल्या जातील अशी त्यांना आशा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -