घरमनोरंजनLove Story Music Event दरम्यान साई पल्लवीने आणि चिरंजीवीने केला धमाकेदार...

Love Story Music Event दरम्यान साई पल्लवीने आणि चिरंजीवीने केला धमाकेदार डान्स

Subscribe

साऊथ सुपरस्टार नागा चैतन्य (Naga chaitanya)आणि साई पल्लवी (Sai Pallavi) यांचा ‘लव्ह स्टोरी’ (love story)रोमँटीक सिनेमा लवकरच थेटरमध्ये रिलीज होणार आहे. सर्व प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिनेमाच्या म्यूझिक प्रमोशन दरम्यान बॉलिवूड अभिनेता मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने (Amir Khan)हजेरी लावली होती. दरम्यान, आमिर सोबत दाक्षिणात्या स्टार चिरंजीवी सुद्धा(Chiranjeevi) उपस्थित होते. यामुळे सगळीकडे अगदी ऊत्साहाचे व आनंदाचे वातारवण निर्माण झाल्याचे अभिनेता नागा चैतन्यने सोशल मीडियावर(social media) ट्विट करत म्हटले आहे.

नागा चैतन्यने त्याच्या अधीकृत ट्विटर अकांऊटवर पोस्ट शेअर करत लिहले आहे की, चिरंजीवी सर आणि आमिर सर लव स्टोरी अनप्लग्ड इंवेटमध्ये हजर राहील्याबद्दल आभार, तुमच्या शब्दांने आम्हाला खूप प्रोत्साहीत केले आहे. लव स्टोरी 24 सप्टेंबर पासून सिनेमागृहात दाखल होणार आहे असे हॅशटॅग देत नागा चैतन्यने आमिर ,चिरंजीवी यांच्यासोबत फोटो पोस्ट केला आहे.

- Advertisement -

आमिर खानने केली नागा चैतन्याची प्रशंसा-

आमिर खानने नागा चैतन्याचे कौतूक करत त्याचा सिनेमा सुपरहीट होण्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला. आमिर म्हणाला, मी पहिल्यांदा नागाशी लाल सिंग चढ्ढा सिनेमाकरीता भेटलो होतो. त्याच्या सोबत काम करने हा एक उत्तम अनुभव होता. आपण अनेक लोकांसोबत काम करतो मात्र ज्या अभिनेत्यामध्ये क्रियेटिव्हीटी आणि उत्तम काम करण्याची क्षमता असते ते आपसूकच आपले मन जींकतात. नागा मी तुझा सिनेमा पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे.

- Advertisement -

चिरंजीवीने केला डांस

म्यूझिक प्रमोशन इव्हेंट दरम्यान चिरंजीवीने त्याच्या डान्स मूव्सने सर्वांना चकीत केले. त्यांनी अभिनेत्री साई पल्लवीसोबत धमाकेदार डान्स केला. दोघांचाही डान्स परफॉर्मंन्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 


हे हि वाचा – Big Boss Marathi 3: म्हणूनच किर्तनकार ‘शिवलीला’, आईनेच सांगितला नावाचा किस्सा

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -