घरमनोरंजन'त्या' Whatsapp चॅटवर दीपिकाने दिला कबुलीजबाब; अडचणीत होणार वाढ?

‘त्या’ Whatsapp चॅटवर दीपिकाने दिला कबुलीजबाब; अडचणीत होणार वाढ?

Subscribe

ड्रग्ज प्रकरणात एनसीबीची दीपिका पादुकोणची विचारपूस केली जात आहे. तिला तिच्या मॅनेजर करिश्मासमोर बसवून प्रश्न विचारले जात आहेत. दीपिकाच्या प्रत्येक उत्तरावर एनसीबी समाधानी नसल्याचे सांगण्यात येत आहे. काही प्रश्नांची तिची उत्तरे एनसीबीला योग्य वाटत नसल्याने एनसीबी प्रश्नांची सरबत्ती करत आहे आणि दीपिकामधून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे. दरम्यान, एक मोठी बातमी समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दीपिका पादुकोणने चौकशीदरम्यान मोठा कबुलीजबाब दिला आहे. एनसीबीसमोर तिने कबूल केले आहे की ती देखील त्या व्हाट्सएप चॅटचा एक भाग असून सध्या त्यावर वाद सुरू आहे. दीपिकाचा हा कबुलीजबाब खूप महत्वाचा मानला जात आहे. त्याच चॅटमध्ये ती करिश्माशी ड्रग्जच्या संदर्भात बोलताना दिसतेय. अशा परिस्थितीत आता या गोष्टीची कबुली देणे तिच्यासाठी अडचणी वाढवणारं
ठरू शकतं.

- Advertisement -

तर दुसरीकडे, एनसीबीला असेही वाटते की दीपिका आणि करिश्मा संपूर्ण तयारीसह चौकशीसाठी आले आहेत. कारण करिश्माला बोलविण्यात आले असता तिने आपल्या वकिलाला सांगितले की, ती आजारी आहे २५ तारखेला येऊ शकेल. दीपिका जेव्हा गोव्यातून आली तेव्हा करिश्माही तिच्यासोबत होती.

काय आहे व्हायरल चॅट

दीपिका – तुमच्याकडे माल आहे?
करिश्मा – हो, पण घरी आहे. मी वांद्र्याला आहे. तू म्हणत असशील तर मी अमितला विचारू शकते.
दीपिका – हो…, प्लीज…
करिश्मा – अमितकडे आहे, तो घेऊन जातोय.
दीपिका – हॅश ना? वीड नाही.
करिश्मा – हो हॅश…, तू कोको कधीपर्यंत येत आहात?
दीपिका – ११.३०/१२.००. shal तिथे कधीपर्यंत आहे?
करिश्मा – त्याने कदाचित ११.३० म्हटले आहे, कारण त्याला १२ पर्यंत दुसरीकडे जायचे आहे.


दीपिका पादुकोणवर नेटिझन्स पेटले; एक सो एक मीम्स व्हायरल!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -