घरमनोरंजनरणवीरच्या लुकवर दीपिका फिदा

रणवीरच्या लुकवर दीपिका फिदा

Subscribe

रणवीर आणि दीपिकाच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा असून नुकतीच सुट्टीवरून ही जोडी परतली आहे. तर यावेळी दीपिकानं रणवीरच्या फोटोवर अतिशय छान कमेंट केली आहे.

रणवीर सिंह आणि दीपीका पादुकोण हे बॉलीवूडमधील सध्याचं हॉट कपल आहे. दोघंही नेहमीच आपल्या इन्स्टावर पोस्ट केलेल्या फोटोवर एकमेकांना कमेंट देत असतात. सोशल मीडियावर या दोघांच्याही अकाऊंटवर त्यांचे चाहते लक्ष ठेवून असतात. रणवीर सिंहनं सोमवारी असाच एक सुटाबुटातील फोटो इन्स्टावर पोस्ट केला. त्या फोटोवर त्यानं “Monday Blues?” अशा प्रकारची कॅप्शन दिली. त्यानंतर त्याच्या चाहत्यांच्या कमेंट्स सुरु झाल्या. पण एका कमेंटनं लक्ष वेधून घेतलं, ती होती दीपिकाची कमेंट “uffff!!!never!!!?”. दीपिकाच्या या कमेंटलादेखील नंतर नेटिझन्सनं रिप्लाय दिला आहे. दीपिका आणि रणवीरच्या लग्नाची जोरदार चर्चा सध्या सगळीकडे सुरु आहे. तर, दोघंही आपलं प्रेम सध्या सोशल मीडियावर स्वीकारताना दिसत आहेत.

ranveer singh
रणवीर सिंह

नुकतीच सुट्टीवरून परतली ही जोडी

दोघांच्या लग्नाची चर्चा असून नुकतीच ही जोडी सुट्टीवरून परतली आहे. दोघांनीही आपलं नातं स्वीकारलं नसलं तरीही नाकारलेलंही नाही अथवा कोणतीही अधिकृत घोषणादेखील केली नाही. सुट्टीदरम्यान, दोघांचे काही फोटोदेखील व्हायरल झाले होते. अमेरिकेतील फ्लोरिडामधील वॉल्ट डिस्नी वर्ल्डमध्ये दोघांचा एक शूट करण्यात आलेला व्हिडिओ व्हायरल झाला होता. व्हिडिओ शूट होत असताना दीपिका शूट करणाऱ्या व्यक्तीला एक छानसं स्माईल देताना दिसत आहे. तर भारतात परत आल्यानंतर गुडबाय किस घेत दीपिकाला निरोप देताना रणवीरचा व्हिडिओदेखील व्हायरल झाला होता. त्यामुळं दोघंही प्रेमात आकंठ बुडाले असून लवकरच लग्न करतील अशी त्यांच्या चाहत्यांना अपेक्षा आहे.

- Advertisement -

रणवीर सध्या चित्रपटांमध्ये व्यग्र

दीपिकानं सध्या आपल्या कोणत्याही प्रोजेक्टविषयी घोषणा केली नाही. दरम्यान, रणवीरनं नुकतंच ‘गुली बॉय’चं चित्रीकरण संपवलं असून यामध्ये तो आलिया भटबरोबर दिसणाार आहे. तर ‘सिम्बा’च्या चित्रीकरणामध्ये तो सध्या व्यग्र आहे. या चित्रटात त्याच्याबरोबर सैफ अली खानची मुलगी सारा अली खान दिसणार आहे. याशिवाय त्यानं १९८३ च्या वर्ल्डकपवर येणाऱ्या ‘८३’ या चित्रपटातदेखील मुख्य भूमिका साकारणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -