घरमनोरंजनAmazon Prime Video वर २३ एप्रिलला 'सायना' चा डिजिटल रिलिज

Amazon Prime Video वर २३ एप्रिलला ‘सायना’ चा डिजिटल रिलिज

Subscribe

'सायना' चित्रपटाच्या डिजिटल प्रिमियरची घोषणा करण्यात आली आहे

अॅमेझॉन व्हिडीओ ने नुकतीच प्रदर्शित झालेली स्पोर्ट्स बियोपिक ‘सायना’ चित्रपटाच्या डिजिटल प्रिमियरची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटात अभिनेत्री परिणीति चोप्रा मुख्य भूमिका साकारत आहे. हा चित्रपट भारतातील नावाजलेली सुप्रसिद्ध शटलर आणि सगळ्यात जास्त प्रशांसनीय बॅटमिंटन खेळाडू सायना नेहवालच्या करियर मधील आलेल्या उतार-चढावा संदर्भात हा चित्रपट आहे. बायोपिक मध्ये अनेक व्यक्तींना अधोरेखित करण्यात आले आहे जे सायना च्या कठीण काळात तसेच तिच्या हार न मानणार्‍या वृतीला उभारी देण्यासाठी तिच्या आयुष्यात मदत करतात.
प्रसिद्ध दिग्दर्शक अमोल गुप्ते यांनी सायना चित्रपटाचे दिग्दर्शन केल आहे. तसेच टी-सिरीज, दीपा भाटीया(अमोल गुप्ते सिनेमा) आणि फ्रंट फुट पिचर्स च्या बॅनर अंतर्गत भूषण कुमार, किशन कुमार, सूरज जयराज आणि राशेश शाह यांनी निर्मित करण्यात आल आहे. त्याचे सह-निर्माते विनोद भानुशाली आणि शिव चाना आहेत. 23 एप्रिलपासून भारता मधे आणि 240 देशातील व प्रदेशातील प्राइम मेंबर्स ‘सायना’ चित्रपट पाहू शकतात.या चित्रपटात सायनाचे बालपण, बॅडमिंटन खेळा विषयी तिचे वाढते आकर्षण आणि हरियाणाहून हैदराबादला येण्याची तिची कथा दाखविण्यात आली आहे. तेथे तिचे जीवन बदलणारे कोच सापडतात. या कथेतून सायनाचा संघर्ष, कर्तृत्व आणि खेळातील जगात स्थान मिळवण्याचा तिचा प्रवास सांगितला आहे. सायना ही एका प्रेरणादायक खेळाडूची कथा आहे.आहे. हे तिचे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन दर्शवते आणि या चित्रपटच्या माध्यमातून लोकांना उत्साहित करणे, माहिती देणे आणि त्यांचे मनोरंजन करणे हे आहे. परिणीती चोप्राला कधीही न पाहिलेला भूमिकेसाठी पाहण्यासाठी सज्ज व्हा. स्ट्रीमिंग सर्व्हिसवरील सायनाच्या डिजिटल प्रीमियरसह.

 

View this post on Instagram

 

A post shared by Parineeti Chopra (@parineetichopra)

- Advertisement -

अॅ मेझॉन प्राइम व्हिडिओ, इंडियाचे दिग्दर्शक आणि कंटेन मुख्य  असलेले श्री. विजय सुब्रमण्यन म्हणाले, “वर्षाच्या बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘सायना’ चा डिजिटल प्रीमियर जाहीर करण्यास आम्हाला आनंद झाला.” परिणीती चोप्राच्या दमदार अभिनयाने  सायनाच्या आयुष्याच्या चॅम्पियनची प्रेरणादायक कथा अधिक  चमकदार केली आहे”आम्ही नेहमीच प्रेक्षकांच्या करमणुकीसाठी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओमध्ये नवीन कथा सादर करण्याचा प्रयत्न करीत आहोत.”


हे हि वाचा – सुप्रसिद्ध तामिळ अभिनेता विवेक यांचे निधन, पंतप्रधानांपासून दिग्गज सेलिब्रिटींनी वाहिली श्रद्धांजली

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -