घरमनोरंजनदिग्दर्शक संजय लिला भन्साळींना कोरोनाची लागण

दिग्दर्शक संजय लिला भन्साळींना कोरोनाची लागण

Subscribe

रणवीर कपूर बरोबरच संजय लिला भन्साळींना ही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

मुंबईमध्ये कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असली तरीही अद्याप कोरोनाचा धोका हा कमी झाला नाही आहे. यासगळ्यातच प्रसिद्द चित्रपट निर्माते संजय लिला भन्साळी यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. संजय लिला भन्साळी हे सध्या गंगुबाई काठियावाडी या चित्रपटाचे चित्रीकरण करत होते. मात्र यादरम्यानच त्यांना कोरोनाची लागन झाल्याचे समजले आहे. व त्यांनी स्वत: ला कॉरन्टाईनही केले आहे. संजय लिला भन्साळी आणि रणबीर कपूर दोघांनाही कोरोनाची लागन झाली आहे. त्यामुळे आलिया आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला कोरोनाची चाचणी करावी लागली आहे.संजय लिला भन्साळी यांना कोरोनाची लागन झाल्याचे समजल्यावर त्यांनी लगेच त्यांच्या आईची चाचणी केली. मात्र त्या कोरोना निगेटिव्ह असल्याचे समोर आले. पण तरीदेखील त्यांनी स्वत: ला कॉरन्टाईन केले असल्याचे समोर आले आहे.

 भन्साळी गंगूबाई काठियावाडीचे शूटिंग करत होते, दरम्यान अभिनेता अजय देवगण पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेसाठी नुकताच सेटवर आला होता. संजय लिला भन्साळीच्या गंगुबाई काठियावाडी हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. मात्र या चित्रपटाच्या नावावरुन वादाला सुरुवात झाली आहे. कामाठीपुरा रहिवाशांनी ते नाव ठेऊ नये अशी भूमिका घेतली आहे. आता भन्साळी कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे आणखी एक संकट या चित्रपटावर आले आहे.

- Advertisement -

हे वाचा- प्रियदर्शन जाधवच्या ‘लव सुलभ’ चे पोस्टर लॉंच, चित्रिकरणालाही सुरुवात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -