घरमनोरंजन'फत्तेशिकस्त' फेम अभिनेता हरीश दुधाडेचं निर्मिती क्षेत्रात पाऊल

‘फत्तेशिकस्त’ फेम अभिनेता हरीश दुधाडेचं निर्मिती क्षेत्रात पाऊल

Subscribe

टेलिव्हिजनवरील बहुचर्चित मालिका तुमची मुलगी काय करते यात इन्स्पेक्टर भोसले आणि फत्तेशिकस्तमध्ये बहिर्जी नाईक अशा सर्वोत्तम भूमिका साकारणारा अभिनेता हरीश दुधाडेनं एका वेगळ्या भूमिकेत आपल्या समोर येणार आहे. आगामी पावनखिंड या चित्रपटातही तो महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. हरीश दुधाडे लवकरचं एका मराठी चित्रपटाची निर्मिती करणार आहे. अद्याप या चित्रपटाचे नाव आणि इतर तपशील जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे त्याच्या नव्या चित्रपटाविषयी अनेकांना उत्सुकता आहे. आत्तापर्यंतच्या करियरमध्ये हरीशने उल्लेखनीय काम केले. मात्र आता तो करिअरच्या वेगळ्या वाटा शोधतोय. त्यामुळे हरीशचा या वाटेवरील प्रवास कसा असेल हे चाहत्यांना आगमी काळात दिसून येईल.

हरीशचे बालपण नगरमध्ये गेले. त्याने शालेय एकांकिका स्पर्धांमधून अभिनयाला सुरुवात केली. यानंतर गणेशोत्सवात वऱ्हाड निघालंय लंडनला या एकपात्री प्रयोगातील प्रवेश सादर केले. कॉलेजच्या दिवसांत भरत जाधव यांच्या सही रे सही या नाटकामुळे तो हरीश भरत जाधव यांचा चाहता झाला. यादरम्यान पुण्यात शिक्षणासाठी येत पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेमधून त्याने अभिनय क्षेत्रात खऱ्या अर्थाने सुरुवात केली. अमिताभ बच्चन यांच्या तीन पत्ती या चित्रपटात ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून काम करण्याच त्याला संधी मिळाली. यावेळी भरत जाधव यांची भेट घेतल्यानंतर अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवण्याचे त्याने निश्चित केले.

- Advertisement -

मुंबईत गाठत त्याने ‘कन्यादान’ या मालिकेपासून प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली, यानंतर हरीशचा अभिनय क्षेत्रातील प्रवास आजपर्यंत उल्लेखनीयच राहिला आहे. गुंडा पुरुष देव, सुहासिनी, माझे मन तुझे झाले, नकळत सारे घडले, तुझ्या इश्काचा नाद खुळा, सरस्वती, तुमची मुलगी काय करते अशा उत्तमोत्तम मालिकेतून हरीशने काम केले. तर मेनका उर्वशी, फर्जंद, फत्तेशिकस्त अशा चित्रपटांतून हरीशनं अभिनेता म्हणून प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं. लवकरचं तो मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित ‘मनाचे श्लोक’ या चित्रपटात झळकणार असून नक्षलबाडी, प्लॅनेट मराठीच्या ‘जॉबलेस’ या वेबसिरीज मध्येही तो काम करत आहे.


दीप सिद्धूची हत्या की अपघात, कुटुंबियांनी सांगितली वेगळीच कहाणी

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -