घरमनोरंजन'इर्सल' चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज

‘इर्सल’ चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज

Subscribe

'राजकारणात गुलालाशिवाय मज्याच नाय!' अशी टॅगलाईन असलेल्या 'इर्सल' चित्रपटाचा फर्स्ट लुक अतिशय आकर्षक असून चित्रपटाचे लक्ष्यवेधी नावामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता  अधीकचं वाढत आहे.

‘इर्सल’ हा बहुचर्चित आगामी मराठी चित्रपट लवकरंच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे फर्स्ट लुक प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. ‘राजकारणात गुलालाशिवाय मज्याच नाय!’ अशी टॅगलाईन असलेल्या ‘इर्सल’ चित्रपटाचा फर्स्ट लुक अतिशय आकर्षक असून चित्रपटाचे लक्ष्यवेधी नावामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता  अधीकचं वाढत आहे.

भलरी प्रॉडक्शनची पहिली निर्मिती आणि राज फिल्म्स प्रस्तुत ‘इर्सल’ या चित्रपटाचे निर्माते विनायक आनंदराव माने आहेत. ‘इर्सल’ चित्रपटातून विक्रम सूर्यकांत आणि शिवानी मोझे पाटील ही नवी जोडी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.  चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, शशांक शेंडे, अनिल नगरकर, अभिनेत्री माधुरी पवार यांच्यासह सुजाता मोगल, शरद जाधव, अजिंक्य निकम, विश्वास सुतार, संजय मोहिते, आदर्श गायकवाड, दिग्विजय कालेकर, ओंकार भस्मे, केतन विसाळ, हर्षाली रोडगे, नागेश नाईक, वैशाली घोरपडे, चैताली बर्डे, अप्पासाहेब कुंडले, सर्जेराव जाधव, हनिफ शेख या कलाकारांच्या भूमिका आहेत.

- Advertisement -

चित्रपटाची टॅग लाईन, पोस्टर यावरून चित्रपटाच्या कथेचा नेमका अंदाज लावता येत नाही. ‘इर्सल’ या शब्दाचा अर्थ इर्षा असा आहे. चित्रपटाच्या टॅगलाइनवरून हा चित्रपट बहुतेक हा राजकारणावर आधारित असावा असा अंदाज बांधला जात आहे.

‘इर्सल’ चित्रपटाची  कथा अनिकेत बोंद्रे यांची असून पटकथा अनिकेत बोंद्रे व महेशकुमार मुंजाळे यांची आहे. संवाद विश्वास सुतार यांचे तर गीत- संगीत दिनकर शिर्के यांनी दिले आहे. ‘फर्स्ट लुक मुळे चर्चेत आलेला ‘इर्सल’ येत्या ३ जून २०२२ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

- Advertisement -

 

चंद्रा आणि दौलतची प्रेमकहाणी ‘चंद्रमुखीचा’ ट्रेलर रिलीज

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -