घरमनोरंजनथिएटरमध्ये खेळण्यासाठी भेटीला येतोय ‘झिम्मा 2’; यंदाची ट्रिप कुठे? पाहा ट्रेलर

थिएटरमध्ये खेळण्यासाठी भेटीला येतोय ‘झिम्मा 2’; यंदाची ट्रिप कुठे? पाहा ट्रेलर

Subscribe

एक मजेशीर अनाऊन्समेंट व्हिडीओ सोशल मीडियावर प्रदर्शित करून त्यांनी या चित्रपटाची घोषणा केली आहे.युट्युबवर 'झिम्मा 2' चा ट्रेलर रिलिज झाला असून हेमंत ढोमेने इन्स्टाग्रामवर खास पोस्ट लिहिली आहे.

कोरोनाचा मोठा फटका फिल्म इंडस्ट्रीला बसलेला असताना मराठी चित्रपट ‘झिम्मा’नं मात्र महाराष्ट्राचा नंबर एक चित्रपट असल्याचा मान पटकावला. लॉकडाऊननंतर संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतात प्रदर्शित झालेला ‘झिम्मा’ हा पहिलाच मोठा मराठी चित्रपट आहे. या शर्यतीत बॉलिवूडचेही अनेक सिनेमे असतानादेखील ‘झिम्मा’ने आपली घोडदौड कायम ठेवली. या चित्रपटाची चर्चा आजही कायम आहे. ‘झिम्मा’ला मिळालेला प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून आता दिग्दर्शक हेमंत ढोमे लवकरच ‘झिम्मा २’ प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी नुकतीच या चित्रपटाची घोषणा केलीय. एक मजेशीर अनाऊन्समेंट व्हिडीओ सोशल मीडियावर प्रदर्शित करून त्यांनी या चित्रपटाची घोषणा केली आहे. यू ट्युबवर ‘झिम्मा 2’ चा ट्रेलर रिलीज झाला असून, हेमंत ढोमेने इन्स्टाग्रामवर खास पोस्ट लिहिली आहे. हिंदी सिनेसृष्टीतील नामवंत निर्मिती संस्था ‘कलर यल्लो प्रोडक्शन’ आणि प्रसिद्ध दिग्दर्शक आनंद एल राय या चित्रपटाची प्रस्तुती करणार आहेत. चलचित्र मंडळी आणि क्रेझी फ्यु फिल्म्सनिर्मित हा चित्रपट येत्या दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विराज गवस, उर्फी काझमी, अजिंक्य ढमाळ हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.

- Advertisement -

यू ट्युबवर रिलीज झालेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अभिनेत्री निर्मिती सावंत निर्मलाच्या भूमिकेत दिसून येत आहेत. निर्मला त्यांच्या पतीकडे ट्रिपला जाण्यासाठी परवानगी मागते. पती तिला ट्रिपला जाण्याची परवानगी देतात, पण सोबत ते ही येतील, असं सांगतात हे ऐकून निर्मलाच्या कपाळावर आट्या येतात. ‘बाया बायाच’ ट्रिपला जाणार असल्याचं ती सांगते. त्यावर “तुमच्यासोबत आपल्या सुनेलाही घेऊन जा..,” असं सांगतात. आता ही सुनबाई कोण असणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत. तसंच ‘झिम्मा २’ आणखी कोणता खेळ रंगवणार हेदेखील जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत.

पाहा ट्रेलर :

- Advertisement -

निर्माते आनंद एल राय म्हणतात, “पुन्हा एक मराठी सिनेमा करताना आम्हाला खूप आनंद होतोय. ‘झिम्मा’ला प्रेक्षकांची वाहवा मिळवली. तसेच २०२१ मधील बॅाक्स ॲाफिसवर जबरदस्त कमाई करणारा हा चित्रपट ठरला. चित्रपटातून एक चांगला संदेश देण्यात आला ज्याने प्रेक्षक प्रभावित झाले आणि म्हणूनच आम्ही ‘झिम्मा २’ आणण्यास चलचित्र मंडळींना पाठिंबा दिला. क्षिती आणि हेमंत सोबत काम करण्यात आनंद आहे.”

दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, ” ‘झिम्मा’वर प्रेक्षकांशी भरभरून प्रेम केले. यातील प्रत्येकीमध्ये गृहिणींनी, तरुणींनी स्वतःला शोधण्याचा प्रयत्न केला. कधी दोन दिवसही एकट्या घराबाहेर न राहिलेल्या महिलांनी त्यांच्या मैत्रिणींसोबत आठवडाभर बाहेर जाण्याचे प्लॅन्स केले. ‘झिम्मा’ सर्वांनाच खूप जवळचा वाटला. आजही मी कुठे गेल्यावर मला अनेक जणी ‘झिम्मा’ आवडल्याचे आवर्जून सांगतात. अनेकींनी ‘झिम्मा २’ लवकरच प्रेक्षकांसाठी घेऊन या, अशी मागणीही केली. त्या माझ्या सगळ्या मैत्रिणींच्या प्रेमाखातरच मी ‘झिम्मा २’चा निर्णय घेतला आणि आता लवकरच ‘झिम्मा २’ही सीमोल्लंघन करण्यासाठी येणार आहे. या वेळी मजा डबल झाली असून हा चित्रपटही प्रेक्षक तितकाच एन्जॅाय करतील.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -