Thursday, July 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन Indianidol:ग्रँड फिनाले पुर्वीच आदित्यने घेतला होस्टिंग सोडण्याचा निर्णय

Indianidol:ग्रँड फिनाले पुर्वीच आदित्यने घेतला होस्टिंग सोडण्याचा निर्णय

5 ऑगस्टला इंडियान आयडलची ट्रॅाफी कोण पटकावणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे.

Related Story

- Advertisement -

हिंदी टेलिव्हिजन मधील सर्वाधिक चर्चेत तसेच वादाच्या भोवऱ्यात असणारी मालिका म्हणजेच ‘इंडियन आयडल 12 ’ (Indian Idol 12) प्रत्येक दिवसाच्या सुरूवातीला मालिकेच्या सेटवर अनेक खळबळजनक घडामोडी घडतांना दिसतात. शोमधील अनेक पुर्व स्पर्धक तसेच परिक्षकांनी देखील या रियालिटी शोवर टिका केली आहे. अनेकदा इंडियन आयडल शोमध्ये पक्षपात करण्यात येत असल्याचे आरोप करण्यात आले आहे. शोमध्ये दाखवण्यात येणाऱ्या ड्रामामुळे सर्वजण वैतागले आहेत. यामुळे शो मधील मेकर्सवर नेटकऱ्यांनी अनेकदा निशाणा साधला आहे. तसेच शो मधील स्पर्धक, परिक्षक आणि होस्टसुद्धा ट्रोलिंगपासून वाचले नाहीत. अशातच आता शो मधील प्रसिद्ध होस्ट आदित्य नारायण (Aditya Narayan) याने पुढील वर्षापासून इंडियन आयडल होस्ट न करण्याचा निर्णय घेतला आहे. आदित्यने ईटाइम्सला दिलेल्या मुलाखती दरम्यान त्याने घेतलेल्या निर्णयाबद्दल स्पष्टीकरण देत म्हंटले आहे की,” मी लहानपणा पासूनच टेलिव्हिजनवर काम करत आहे. तेव्हा मी खूप लहान होतो आता पुढील वर्षी जेव्हा काम सोडणार तोपर्यंत मी बाप होईन. टिव्ही इंडस्ट्रीने मला नाव,पैसा,प्रसिद्धी,यश दिलं आहे. टेलिव्हिजनमुळेच मी मुंबईत उत्कृष्ठ जीवन जगत आहे. मी टीव्हीवरील काम सोडणार नाही फक्त काही वेगळ,नवीन,मोठी गोष्ट करणार आहे. माझी एका सुत्रसंचालकाच्या म्हणजेच होस्टची भूमिका आता संपणार आहे. मी पुढील वर्षापासून टीव्हीवरून ब्रेक घेणार आहे. तसेच मी गेल्या 15 वर्षापासून याचा भाग आहे. यामुळे आता मला काही वेगळ नाविन्यपुर्ण गोष्ट करायची आहे.”

- Advertisement -

 

यंदाचा इंडियन आयडल सीझन चांगलाच वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. शोमध्ये दाखवण्यात येणाऱ्या कंटेटवर अनेक पुर्व स्पर्धकांनी तसेच परिक्षकांनी अनेकदा प्रश्न उपस्थित करत शो फक्त टिआरपी खेचण्यासाठी फेक कंटेटे दाखवत असल्याचे वक्तव्य केलं होतं. आता काही दिवसातच या शोची सांगता होणार असून 15 ऑगस्टला इंडियन आयडलची ट्रॅाफी कोण पटकावणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे.


- Advertisement -

हे हि वाचा –  IPL सट्टेबाजी पासून ते बिटकॉईन फ्रॉड, राज कुंद्रावर झाले आहेत गंभीर आरोप

- Advertisement -