घरमनोरंजनतुनिषाच्या आत्महत्येत शीजानला आरोपी ठरवणं चुकीचं... उर्फी जावेदकडून पाठराखण

तुनिषाच्या आत्महत्येत शीजानला आरोपी ठरवणं चुकीचं… उर्फी जावेदकडून पाठराखण

Subscribe

हिंदी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री तुनिषा शर्माने शनिवारी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. हिंदी वाहिनीवरील ‘दास्तान-ए-काबुल’ या मालिकेत ती मुख्य भूमिका साकरात होती. तिने मालिकेच्या सेटवरील मेकअप रुममध्ये गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. वसईच्या कामन परिसरातील एका स्टुडिओमध्ये ही घटना घडली आहे. तुनिषाच्या आत्महत्येनंतर संपूर्ण मनोरंजनसृष्टीला धक्का बसला आहे. शिवाय तिचे कुटुंबीय देखील पूर्णपणे खचून गेले आहेत. पोलिसांनी संशयित आरोपी शीजान खानला अटक केली आहे. दरम्यान, या प्रकरणावर उर्फी जावेदने शीजान खानची पाठराखण केली आहे.

उर्फी जावेदने केली शीजानची पाठराखण

- Advertisement -

तुनिषाच्या आत्महत्येनंतर अनेकांनी शीजानला आरोपी ठरवलं मात्र उर्फी जावेदने या प्रकरणात शीजाद खानची पाठराखण केली आहे. उर्फीने तिच्या इंस्टाग्राम पोस्टवरुन शीजानला पाठिंबा दिला आहे. या पोस्टमध्ये उर्फीने लिहिलंय की, “हो.. शीजान चुकीचा असू शकतो, कदाचित त्याने तुनिषाला त्याने धोका दिला असेल. परंतु तुनिषाच्या मृत्यूवर शीजानला आरोपी ठरवणं चुकीचं आहे. जेव्हा कोणाला सोबत राहायचं नसेल तर त्या व्यक्तीला तुम्ही जबरदस्ती नाही करु शकत. मी सांगू इच्छिते की कोणीही इतके लायक नसते की त्यासाठी तुम्ही तुमचा जीव द्याल. कधी कधी असं वाटेल की हे जग नष्ट झालंय पण माझ्यावर विश्वास ठेवा. ते कधीही नष्ट होत नाही. अशावेळी त्या लोकांचा विचार करा जे तुमच्यावर प्रेम करतात आणि स्वतःवर आणखी प्रेम करा. स्वतःचे हीरो व्हा. आत्महत्येनंतर देखील हा त्रास कमी होत नाही, ज्यांना तुम्ही मागे सोडलं आहे ते सर्वांत जास्त दुःखी असतात.”

- Advertisement -

शीजानसोबतच्या ब्रेकअपमुळे तुनिषाने केली आत्महत्या
‘दास्तान-ए-काबुल ‘या मालिकेतील अभिनेत्री तुनिषा शर्माचा मालिकेतील सहकलाकार शीजान खानने तुनिषाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. खरंतर, शीजान आणि तुनिषा एकमेकांना डेट करत होते. नुकत्याच काही दिवसांपूर्वी त्यांचा ब्रेकअप झाला होता. शीजानने तिला धोका दिला असल्याचे म्हटलं जात आहे. ज्यामुळे ती सतत चिंतेत असायची. या प्रकरणात पोलिसांनी शीजानवर तुनिषाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याची तक्रार दाखल केली आहे. तुनिषाच्या आईने शीजानवर हे आरोप केले आहेत.


हेही वाचा :

शीजानला भेटल्यापासून तुनिषा वापरू लागली हिजाब; तुनिषाच्या काकांचा दावा

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -