घरमनोरंजनशीजानला भेटल्यापासून तुनिषा वापरू लागली हिजाब; तुनिषाच्या काकांचा दावा

शीजानला भेटल्यापासून तुनिषा वापरू लागली हिजाब; तुनिषाच्या काकांचा दावा

Subscribe

हिंदी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री तुनिषा शर्माने शनिवारी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. हिंदी वाहिनीवरील ‘दास्तान-ए-काबुल’ या मालिकेत ती मुख्य भूमिका साकरात होती. तिने मालिकेच्या सेटवरील मेकअप रुममध्ये गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. वसईच्या कामन परिसरातील एका स्टुडिओमध्ये ही घटना घडली आहे. तुनिषाच्या आत्महत्येनंतर संपूर्ण मनोरंजनसृष्टीला धक्का बसला आहे. शिवाय तिचे कुटुंबीय देखील पूर्णपणे खचून गेले आहेत. दरम्यान नुकत्याच एक-दोन दिवसांपूर्वी, एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना तुनिषाचे काका पवन शर्मा यांनी हे प्रकरण नक्कीच लव जिहाद संबंधित असल्याचं म्हटलं होतं. दरम्यान, आता समोर आलेल्या माहितीनुसार तुनिषा शीजानला भेटल्यापासून तिच्यामध्ये अनेक बदल झाल्याचे त्यांनी सांगितले आहे.

शीजानला भेटल्यापासून तुनिषा हिजाब वापरायची

- Advertisement -

तुनिषाच्या काकांनी असा दावा केला आहे की, जेव्हापासून तुनिषा, शीजानला भेटली तेव्हापासून तिचं वागणं खूप बदलून गेलं होत. शिवाय ती कधी कधी हिजाब देखील घालायची. तसेच याआधी तिच्या काकांनी हे प्रकरण लव जिहाद असल्याचं देखील म्हटलं होतं.

शीजानसोबतच्या ब्रेकअपमुळे तुनिषाने केली आत्महत्या
‘दास्तान-ए-काबुल ‘या मालिकेतील अभिनेत्री तुनिषा शर्माचा मालिकेतील सहकलाकार शीजान खानने तुनिषाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. खरंतर, शीजान आणि तुनिषा एकमेकांना डेट करत होते. नुकत्याच काही दिवसांपूर्वी त्यांचा ब्रेकअप झाला होता. शीजानने तिला धोका दिला असल्याचे म्हटलं जात आहे. ज्यामुळे ती सतत चिंतेत असायची. या प्रकरणात पोलिसांनी शीजानवर तुनिषाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याची तक्रार दाखल केली आहे. तुनिषाच्या आईने शीजानवर हे आरोप केले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा  :

बॉलिवूडच्या फ्लॉप चित्रपटांत ‘सर्कस’चा समावेश; आठवड्यात कमावले केवळ इतके कोटी

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -