घर मनोरंजन जया रडत होती आणि रेखा बघत होती

जया रडत होती आणि रेखा बघत होती

Subscribe

बॉलिवूड मधील अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांना पाहून लोकांचा लग्नावरचा विश्वास अधिक वाढला जातो. त्यांचे रिलेशनशिप हे प्रेमासह दीर्घकाळ नाते कसे टिकवून ठेवावे याचे उत्तम उदाहरण आहे. ‘एक नजर’ च्या शूट वेळी दोघे एकमेकांच्या जवळ आले होते आणि त्यांनी लग्न सुद्धा केले. त्यांच्या आयुष्यात काही चढउतार ही आले. पण त्यांच्या प्रेमामुळे त्यांना ठामपणे सामोरे जाता आले. ग्लॅमरच्या जगात अभिनेत्याचे नाव एका वेगळ्याच अभिनेत्री सोबत जोडले जाणे हे सर्वसामान्य आहे. यामध्ये अमिताभ बच्चन सुद्धा आहेत. जेव्हा मोठ्या रुपेरी पडद्यावरील रोमांस हा खऱ्या आयुष्यातील एक हिस्सा बनला होता.

अमिताभ बच्चन यांचे नाव जीनत अमान, परवीन बाबी आणि स्मिता पाटील यांच्यासोबत जोडले गेले होते. पण आजही रेखासोबत त्यांचे नाव जोडले जाते. अभिनेत्रीने बहुतांश मुलाखतीत तिचे अमिताभ बच्चन यांच्यावर प्रेम असल्याचे जाहीर केले होते. लग्नाच्या तीन महिन्यानंतर अमिताभ यांनी जेव्हा आपल्या को-अॅक्ट्रेस रेखाला पाहिले तेव्हा त्यांच्या अफेअरची चर्चा जया यांच्यासोबतच्या नात्याला प्रभावित करत होती. स्टारडस्टला दिलेल्या एका मुलाखतीत रेखा यांनी असे म्हटले होते की, जया यांनी माझा आणि अमिताभ बच्चन यांचा रोमँन्टिक सीन पाहून रडत होत्या.

- Advertisement -

खरंतर मुकद्दर का सिकंदर मध्ये रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्यामधील रोमँन्टिक सीनमुळे जयाला धक्का बसला होता. रेखा यांनी असे म्हटले होते की, जेव्हा संपूर्ण बच्चन परिवार त्या सिनेमाच्या ट्रायल शो ला गेले होते तेव्हा मी त्यांना प्रोजेक्शन रुममधून पाहत होती. जया फ्रंटला बसून रडत होती आणि अमिताभ व त्यांचे आई-वडिल सुद्धा तेथेच होते. मी जया यांना स्पष्टपणे पाहू शकत होती. पण त्या मला पाहू शकत नव्हत्या. आमचा रोमँन्टिक सीन पाहिला तेव्हा जया खुप रडत होत्या.

- Advertisement -

रेखा यांनी पुढे असे म्हटले होते की, अमिताभ बच्चन यांनी काही फिल्म प्रोड्युसरला सांगितले होते की, ते तिच्यासोबत यापुढे एकाही सिनेमात काम करणार नाहीत. बिग बी यांनी घेतलेल्या या निर्णयाची जोरदार चर्चा होऊ लागली होती. हे जेव्हा रेखा यांना कळले तेव्हा त्यांनी अमिताभ बच्चन यांना याचे कारण विचारले. तेव्हा त्यांनी यावर एकही शब्द उच्चारला नाही.

अभिनेत्रीने पुढे असे ही म्हटले की, सिनेमाच्या ट्रायल शो च्या आठवड्याभरानंतर इंडस्ट्री मधील प्रत्येक व्यक्ती मला सांगत होता की, प्रोड्युसर्स यांना स्पष्ट सांगितले आहे माझ्यासोबत ती काम करणार नाही. प्रत्येकानेच मला या बद्दल सांगितले. पण अमिताभ बच्चन यांनी कधीच एका शब्दाने त्यामागील कारण सांगितले नाही. पुन्हा विचारले तेव्हा सुद्धा मी एकही शब्द बोलणार नाही, त्यामुळे तू मला विचारु नकोस असे म्हटले होते.

सिनेमा ‘दोन अजनाने’ च्या सेटपासून रेखा आणि अमिताभ यांच्या अफेअरची चर्चा रंगण्यास सुरुवात झाली होती. त्यावेळचे त्यांचे हे सर्वाधिक वादग्रस्त अफेअर होते. असे सांगितले जाते की, यश चोपडा यांचा सिनेमा सिलसिला हा जया, अमिताभ आणि रेखा यांच्या लव्ह ट्रायंगलवर तयार करण्यात आली आहे. याच सिनेमात ते दोघे शेवटचे दिसून आले होते.


हेही वाचा- मीनाक्षी शेषाद्री हिने बॉलिवूड का सोडले?

- Advertisment -