घरमनोरंजनखूप घाणेरडी भाषा आहे त्याची... माधुरीवरील आक्षेपार्ह टिप्पणीवर जया बच्चन संतापल्या

खूप घाणेरडी भाषा आहे त्याची… माधुरीवरील आक्षेपार्ह टिप्पणीवर जया बच्चन संतापल्या

Subscribe

OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवरील (Netflix) ‘बिग बँग थिअरी’ (Big Bang Theory) हा कार्यक्रम सध्या चांगलाच चर्चेत आहे. या कार्यक्रमातील एका भागात बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितबद्दल आक्षेपार्ह भाषेचा वापर करण्यात आला होता. ज्यावर आक्षेप घेत लेखक आणि राजकीय विश्लेषक मिथुन विजय कुमार यांनी या प्रकरणी नेटफ्लिक्सला नोटीस पाठवली होती. तेव्हापासून हे प्रकरण चांगलंच चर्चेत आलं आहे. दरम्यान, आता या प्रकरणी दिग्गज अभिनेत्री जया बच्चन यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

एका वृत्तपत्राशी संवाद साधताना जया बच्चन म्हणाल्या की, “हा मुलगा वेडा आहे का? खूप घाणेरडी भाषा आहे याची, याला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये पाठवायला हवं. याच्या कुटुंबीयांना विचारायाला हवं, याच्या माधुरीबद्दलच्या कमेंटवर त्यांना कसं वाटलं?” असं म्हणत जया बच्चन यांनी आपला राग व्यक्त केला आहे.

- Advertisement -

ये उसी शो का सीन है, अब तक द बिग बैंग थ्योरी के 12 सीजन आ चुके हैं।

तर अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने देखील याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, “मी हा कार्यक्रम पाहिला नाही. परंतु या शोमध्ये आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला जात आहे, त्यामुळे या लोकांची मानसिकता किती घाण आहे हे यातून कळत आहे. अशा प्रकारचं वक्तव्य त्यांना विनोदी वाटते?” असं उर्मिला म्हणाली.

- Advertisement -

काय आहे प्रकरण?

नेटफ्लिक्सवर दाखवल्या जाणाऱ्या‘बिग बँग थिअरी’ या शोच्या दुसऱ्या सीझनच्या पहिल्या भागात शेल्डन कूपरच्या भूमिकेत जिम पार्सन्सने माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या राय यांची चुकीची तुलना केली. तुलना करताना त्याने माधुरीवर एक टिप्पणी केली. ज्यात जिम पार्सन्स म्हणतो की, “ऐश्वर्या राय गरीबांची माधुरी दीक्षित आहे.” यावर उत्तर देत राज कुथरापल्लीच्या भूमिकेतील कुणाल नायर म्हणतो की, “ऐश्वर्या राय देवीसारखी आहे आणि तिच्या तुलनेत माधुरी दीक्षित एक वेश्या आहे.” माधुरीबाबतची ही आक्षेपार्ह टिप्पणी ऐकून मिथुन विजय कुमारने नेटफ्लिक्सला नोटीस बजावली आहे.

 


हेही वाचा :

उर्फी जावेद किन्नर? ‘या’ अभिनेत्याने केला दावा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -