घरताज्या घडामोडीCBI चौकशी करा, सुशांतला माझ्या मुलीप्रमाणेच मारण्यात आलय, जियाच्या आईने केली मागणी

CBI चौकशी करा, सुशांतला माझ्या मुलीप्रमाणेच मारण्यात आलय, जियाच्या आईने केली मागणी

Subscribe

सुशांतसिंग राजपूत आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांच्या चौकशीबाबत असमाधानी कुटुंबियांनी सीबीआय चौकशीची मागणी केली.  त्यानंतर आता बॉलिवूड अभिनेत्री जिया खानची आई रबिया आपल्या मुलीच्या मृत्यूची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. त्याचे म्हणणे आहे की ज्याप्रमाणे त्यांच्या मुलीचा मृत्यू झाला, आत्महत्या दाखवली गेली त्याचप्रमाणे सुशांतच्या मृत्यूबाबतही घडले आहे. माझ्या मुलीलाही आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांनी देखील आता पोस्ट शेअर करत जियाच्या मृत्यूची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.

जियाची आई म्हणते, सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूला सुसाइड म्हटलं गेलं.  त्याचप्रमाणे माझ्या मुलीचीही हत्या अशाच प्रकारे करण्यात आली आहे. त्यामुळे सीबीआयने या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करावी. नाहीतर पोलिसांवर असलेल्या राजकीय दबावामुळे सत्य कधीच उघड होणार नाही.

- Advertisement -

जियाच्या आईने पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ‘जिया खानप्रमाणेच सुशांत सिंग यांनाही मारण्यात आलं आहे. सुशांत आणि जीया दोघांनाही प्रेमात फसवलं गेलं. दोघानाही पैशासाठी वापरलं गेलं होतं आणि कौटुंबापासून दूर ठेवलं गेलं. जिया आणि सुशांत दोघेही मानसिकरित्या दुर्बल झाले होते. काम नसल्यामुळे ते निराश झाले होते. झिया खान आणि सुशांतच्या मृत्यूचे धागेदोरे बॉलिवूडच्या माफिया आणि नेत्यांशी संबंधित आहेत.  त्यामुळेच राजकीय दबावामुळे पोलिस सत्य समोर आणू शकत नाहीयेत.

सीबीआयने या प्रकरणांच्या तळाशी जाऊन या गुन्हेगारांचा शोध घ्यावा. अन्यथा अशा अनेक घटना पुढे घडू शकतात. जिया-सुशांत सारख्या इतर निष्पाप लोकांचा यात नाहक बळी जाऊ शकतो.

- Advertisement -

जियाच्या बॉयफ्रेंडवर होता आरोप

सात वर्षांपूर्वी ३ जून २०१३ ला जिया खानने आपल्या फ्लॅटमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणात जिआचा प्रियकर अभिनेता सूरज पंचोली यांचे नाव समोर आले आहे. सूरज पंचोलीनेच आपल्या मुलीची हत्या केली आहे असं तीच्या आईचं म्हणणं आहे. या आधी सीबीआयने जिया खानच्या मृत्यूची चौकशी केली असून ही चौकशी अद्याप सुरू आहे, यासाठी सूरज पंचोली अनेक वेळा सुनावणीस गेले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -