Sunday, May 9, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन 'ऋषी कपूर मला इनसिक्योर अभिनेत्री म्हणायचे', जूही चावलाने ऋषी कपूर यांच्या आठवणींना...

‘ऋषी कपूर मला इनसिक्योर अभिनेत्री म्हणायचे’, जूही चावलाने ऋषी कपूर यांच्या आठवणींना दिला उजाळा

Related Story

- Advertisement -

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांनी ३० एप्रिल २०२० मध्ये जगाचा निरोप घेतला. दरम्यान शुक्रवारी कपूर कुटुंबीय आणि चाहत्यांकडून त्यांची पहिली पुण्यतिथी साजरी केली जाणार आहे. बॉलिवूडमधील अनुभवी आणि दिग्गज कलाकारांमध्ये ऋषी कपूर यांचे नाव घेते जाते. आजपर्यंत अनके बड्या कलाकारांसह त्यांनी अभिनय करत बॉलिवूडमध्ये वेगळी छाप सोडली. दरम्यान ऋषी कपूर यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त बॉलिवूड अभिनेत्री जूही चावला हिने त्यांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. जूहीने ऋषी कपूर यांच्यासोबतच्या विशेष आठवणी चाहत्यांसाठी शेअर केल्या आहेत. जूही चावला आणि ऋषी कपूर यांनी बॉलिवूडमधील बऱ्याच उत्तम आणि हिट चित्रपटांत काम केले. जूही चावला इंग्रजी वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत ऋषी कपूर यांच्यासोबतच्या शूटिंगदरम्यानच्या सेटवरील आठवणी शेअर केल्या आहेत.

या आठवणींबद्दल सांगताना जुही चावला म्हणते, ऋषी कपूर मला एक इनसिक्योर अभिनेत्री म्हणायचे कारण मी प्रत्येक सीननंतर मॅनिटरकडे जात झालेला सीन पून्हा एकदा पाहयचे. परंतु ऋषी कपूर बाहेरून जितके रागीट वाटतात तितके ते ह्रदयाने मऊ होते. अनेकदा चित्रपटाचा शूटिंगदरम्यान ते माझी थट्टामस्करी करायचे. जुही पुढे सांगते, चिंटूजी (ऋषी कपूर) बाहेरून खूप रागीट आणि कठोर स्वभावाचे वाटायचे परंतू त्यांचा स्वभाव अगदी मृदू होता. चिंटूजींची बोलण्याची पद्धत अगदी वेगळी होती. कारण ते नॉर्मल बोलायचे तेव्हाही ओरडतायत की काय असे वाटायचे. परंतु त्यांचा खरा स्वभाव समजल्यानंतर मलाही त्यांचाशी बोलणे आवडू लागले.

- Advertisement -

ऋषी कपूर इनसिक्योर एक्टर असे का म्हणाले होते याबाबत सांगताना जूही सांगते की, एका चित्रपटाचा शुटिंगदरम्यान मी प्रत्येक सीन योग्य झाला आहे की नाही हे पाहण्यासाठी मॉनिटरकडे जाऊन तोच सीन पुन्हा एकदा पाहत होते. यावेळी ऋषी कपूर यांनी आपल्या वेगळ्या शैलीत मला ओरडून सांगितले की, मॉनिटर दिग्दर्शकासाठी आहे, तुझ्यासाठी नाही. ते दृश्य खूपच हास्यास्पद होते. त्यांची ओरडून बोलण्याची मला फार आवडायची.

विशेष म्हणजे बऱ्याच वर्षानंतर ऋषी कपूर आणि जूही चावला शर्माजी नमकीन या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार होते. मात्र ऋषी कपूर यांचा निधनानंतर ऋषी कपूर यांचा जागी अभिनेते परेश रावल दिसणार आहेत. ऋषी कपूर गेली दोन वर्षे कर्करोगाशी झुंज देत होते, न्यूयॉर्कमध्ये त्यांच्यावर कर्करोगाचा उपचारदेखील झाले होते मात्र 30 एप्रिल २०२० या कोरोना काळात त्यांची प्राण ज्योत मावळली.


- Advertisement -

 

- Advertisement -