कंगना आणि बहीण रंगोलीला आज पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश

Kangana Ranaut and sister Rangoli ordered to appear before Mumbai police today

सतत आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असलेली अभिनेत्री कंगना रनौत आणि तिची बहीण रंगोलीला मुंबईत पोलिसांसमोर हजर राहायचे आहे. यापूर्वी कंगनला दोनदा समन्स पाठवूनही ती पोलिसांसमोर हजर राहिली नव्हती. आता पोलिसांनी तिसऱ्यांदा समन्स बजावला असून कंगना आणि रंगोली पोलिसांसमोर हजर होणार का यांची उत्सुकता आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

दोन समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याने कंगना आणि तिची बहीण रंगोली विरोधात न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. कंगनाने बॉलिवूड इंडस्ट्रीत मुस्लिमांचे प्राबल्य असल्याचे वक्तव्य केले होते. तसेच झाशीच्या राणीच्या जीवनावर आधारित चित्रपट करून इस्लामी प्राबल्य मोडून काढल्याचे कंगना म्हणाली होती. त्यामुळे कंगनावर दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा आरोप लावण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

माहितीनुसार, कंगना आज चौकशीसाठी हजर होणार की नाही? असा निरोप काल संध्याकाळपर्यंत वांद्रे पोलिसांना आलेला नाही. याधी कंगना आणि रंगोलीला २६ ऑक्टोबर आणि १० नोव्हेंबरला समन्स बजावण्यात आले होते. दोन्ही वेळेला कंगनाकडून टाळाटाळ करण्यात आले पाहायला मिळाले. भावाचं लग्न असल्याचे कारण देत कंगनाने १५ नोव्हेंबरनंतर येण्याची मुदत मागितली होती. १५ नोव्हेंबर होऊन अजूनही कंगनाकडून कोणतीही प्रतिक्रिया पोलिसांनी मिळाली नाही आहे. त्यामुळे कंगना तिसरा समन्स बजावूनही आज हजेरी लावते की पुन्हा मुजोरी दाखवते याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

कंगना नेहमीच वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी कंगनाने थेट महिला आयपीएस अधिकाऱ्याशी पंगा घेतला होता. कंगनाने ट्विटरच्या माध्यमातून थेट आयपीएस अधिकारी रुपा मुद्गल यांच्यावर निशाणा साधला होता. रुपा यांना पोलीस खात्यावरचा धब्बा असल्याचे कंगनाने म्हटले होते. तसेच त्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी केली होती.


हेही वाचा – उपचार घेत असताना प्रभुदेवा डॉक्टरच्या पडला प्रेमात, लॉकडाऊनमध्ये उरकले लग्न