घरमनोरंजनकन्नड अभिनेते नितीन गोपी यांचे वयाच्या 39व्या वर्षी निधन

कन्नड अभिनेते नितीन गोपी यांचे वयाच्या 39व्या वर्षी निधन

Subscribe

कन्नड चित्रपटसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. कन्नड चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेते नितीन गोपी यांचे निधन झाले. शुक्रवारी (2 जून) रोजी सकाळी वयाच्या 39 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. नितीन यांच्या आकस्मिक निधनाने त्यांच्या कुटुंबाला आणि संपूर्ण कन्नड चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. शिवाय त्यांचे चाहते देखील ही बातमी वाचूक भावूक झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नितीन गोपी हे बंगळुरू येथील त्यांच्या घरी होते, तेव्हा त्यांच्या अचानक छातीत दुखू लागले. प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान हॉस्पिटलमध्येच त्यांचे निधन झाले.

- Advertisement -

अभिनेते नितीन गोपी यांचे कन्नड मनोरंजनसृष्टीला मोठे योगदान

नितीन गोपी हे कन्नड चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते होते. ‘हॅलो डॅडी’ या चित्रपटातील त्यांच्या व्यक्तिरेखेचे आणि अभिनयाचे खूप कौतुक झाले. याशिवाय नितीन ‘केरलिदा केसरी’, ‘मुत्थिनंत हेंडती’, ‘निशब्धा’ यांसारख्या चित्रपटांमध्येही दिसले होते. ‘पुर्नविवाह; या लोकप्रिय मालिकेतही नितीनने महत्त्वाची भूमिका साकारली होती. नितीन यांनी चित्रपटांव्यतिरिक्त टीव्हीवरही बरेच काम केले आहे. ‘हर हर महादेव’ या मालिकेच्या काही भागांमध्ये अभिनेत्याने कॅमिओ केला आणि अनेक तमिळ शोमध्येही काम केले होते.

दरम्यान, गेल्या महिन्यात तमिळ आणि तेलुगू चित्रपटांत काम करणाऱ्या चरथ बाबू यांचे महिन्यात निधन झाले होते. तर, एप्रिल महिन्यात 52 वर्षीय अभिनेता अल्लू रमेश यांचेही ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते.

- Advertisement -

 


हेही वाचा :

अभिनेते-दिग्दर्शक आमीर हुसैन यांचे वयाच्या 66 व्या वर्षी निधन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -