घरमनोरंजनविराट ’हॉट’ वाटतो...

विराट ’हॉट’ वाटतो…

Subscribe

आयपीएल क्रिकेट स्पर्धेची सांगता येत्या वीकेण्डला होत असताना 27 मे रोजी स्टार प्लसने अंतिम सामन्यापूर्वी दोन तास एका खास कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ‘क्रिकेट फायनल पार्टी तो बनती है’, नावाच्या या कार्यक्रमात बॉलीवूड आणि टीव्हीवरील अनेक सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत. या सेलिब्रिटींपैकी एक आहे बॉलीवूडची प्रसिध्द अभिनेत्री करीना कपूर.

करीनाने अलीकडेच मुंबईत या कार्यक्रमाचे चित्रीकरण केले आणि त्यात ती आपल्या ‘वीरे दी वेडिंग’ या आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रसिध्दीसाठी सहभागी झाली होती. यावेळी तिला कोणता क्रिकेटपटू सर्वाधिक आवडतो, असे विचारले असता करीना म्हणाली, मला विराट कोहली खूप आवडतो कारण तो तंदुरुस्तही आहे आणि मला तो खरेच ’हॉट’ही वाटतो! पण आता त्याचे लग्न झाले असल्याने मला माझा नबाबच अधिक प्रिय आहे!

- Advertisement -

आपल्याला क्रिकेट हा खेळ खूप आवडतो, असे ती म्हणाली. आपण लहान असताना हा खेळ कशा प्रकारे खेळला जात असे, याविषयी ती बोलली. तो सभ्य माणसांचा खेळ म्हणून ओळखला जात असे. आजकालचे क्रिकेट सामने हे खेळ वाटत नाहीत, तर एक लढाई सुरू आहे, असे वाटते!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -