Tuesday, April 13, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी बॉलिवूड कोरोनाच्या कचाट्यात! विकी कौशलनंतर कतरिना कैफ कोरोना पॉझिटिव्ह

बॉलिवूड कोरोनाच्या कचाट्यात! विकी कौशलनंतर कतरिना कैफ कोरोना पॉझिटिव्ह

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्रातील कोरोनाच्या विळख्यात आता बॉलिवूडचे अनेक कलाकार अडकत आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक बॉलिवूडच्या कलाकार पॉझिटिव्ह येत आहे. काल अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि चॉकलेट बॉय विकी कौशल कोरोनाबाधित आढळले होते. आता विकी कौशल पाठोपाठ अभिनेत्री कतरिना कैफला कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती कतरिनाने स्वतः आपल्या इन्स्टाग्रामच्या स्टोअरीवरून शेअर केली आहे.

कतरिनाने लिहिले आहे की, ‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी त्वरित स्वतःला आयसोलेटेड केले असून होम क्वारंटाईनमध्ये आहे. डॉक्टरांच्या सल्लानुसार सुरक्षितेबाबतचे सर्व प्रोटोकॉलचे पालन करत आहे. जे कोणी गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आले आहे, त्यांनी त्वरित कोरोना चाचणी करा, अशी विनंती आहे. मी सर्वांची कृतज्ञ आहे. सुरक्षित राहा आणि काळजी घ्या.’

- Advertisement -

दरम्यान गेल्या अनेक महिन्यांपासून बी टाऊनमध्ये विकी आणि कतरिनाच्या अफेअरची चांगली चर्चा सुरू आहे. दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे म्हटले जात आहे. तसेच या दोघांना अनेक कार्यक्रमात एकत्र पाहिले आहे. त्यामुळे आता दोघ एकत्र कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे त्याच्या अफेरच्या चर्चेत आणखीनच भर पडली आहे.

अभिजित सावंतला कोरोनाची लागण

- Advertisement -

इंडियन आयडल विजेता अभिजीत सावंतचा देखील कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याने ट्विटर अकाउंटवरून आपल्या चाहत्यांना याबाबतची माहिती दिली आहे. अभिजीत सावंतने ट्वीटमध्ये असे लिहिले की, ‘मी कोरोना पॉझिटिव्ह आलो आहे. सुरक्षित राहा आणि सावधगिरी बाळगा. मास्क घालण्याकडे दुर्लक्ष करू नका.’


हेही वाचा – काढा पिऊन झालो बरा.. कोरोना पॉझिटिव्ह मिलिंद सोमन


 

- Advertisement -