येत्या ३ महिन्यांत केएल राहुल आणि अथिया यांचा मुंबईत पार पडणार विवाह सोहळा

सूत्रांच्या माहितीनुसार, राहुलच्या घरच्यांनी काही दिवसांपूर्वीच अथियाच्या घरच्यांची भेट घेतली आहे. अथिया आणि राहुल आपल्या कुटुंबियांसोबत आपलं नवीन घर सुद्धा पाहायला गेले होते. जिथे ते लग्नानंतर राहणार आहेत

क्रिकेटर केएल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टीच्या नात्याच्या चर्चा वारंवार चालू असतात. मागील काही दिवसांपूर्वी केएल राहुल आणि अथिया विवाह बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा चालू होत्या. सूत्रांच्या माहितीनुसार, या बातमीवर शिक्कामोर्तब झाला असून राहुल आणि अथिया आता लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत.

विवाह बंधनात अडकणार केएल राहुल आणि अथिया

 

View this post on Instagram

 

A post shared by Athiya Shetty (@athiyashetty)

सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या तीन महिन्यात केएल राहुल आणि अथिया लग्न करू शकतात. तसेच दोघांच्या घरी लग्नाची जोरदार तयारी चालू आहे.

मुंबईमध्ये होणार पार पडणार विवाह सोहळा
सूत्रांच्या माहितीनुसार, राहुलच्या घरच्यांनी काही दिवसांपूर्वीच अथियाच्या घरच्यांची भेट घेतली आहे. अथिया आणि राहुल आपल्या कुटुंबियांसोबत आपलं नवीन घर सुद्धा पाहायला गेले होते. जिथे ते लग्नानंतर राहणार आहेत. तसंच पुढील ३ महिन्यांमध्ये मुंबई येथे पार पडेल. दोन्ही कुटुंबियांसाठी हा खास क्षण असणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by KL Rahul👑 (@klrahul)

याआधी सुद्धा अथिया शेट्टी आणि केएल राहुल डिसेंबर महिन्यात लग्न करणार असल्याच्या चर्चा चालू होत्या. आता समोर आलेल्या माहितीनुसार, २०२२ मध्येच केएल राहुल आणि अथिया आपल्या आयुष्याची नवी सुरूवात करणार आहेत. या दोघांचे चाहते यांना आपल्या आयुष्याची नवी सुरूवात करताना पाहून खूप खूश आहेत.

 


हेही वाचा :आपल्या एका वाक्याने जर…मकरंद देशपांडेंचा कलाकारांना खास सल्ला